घरदेश-विदेशकॅनडापेक्षा भारतच वरचढ, भक्कम; कॅनडा-भारत वादावर 'या' देशाने मांडली भूमिका

कॅनडापेक्षा भारतच वरचढ, भक्कम; कॅनडा-भारत वादावर ‘या’ देशाने मांडली भूमिका

Subscribe

खलिस्तानी दहशतवादी निज्जर याच्या हत्येत भारताचा हात असू शकतो असा संशय व्यक्त करत कॅनडाचे पंतप्रधान टुडो यांनी भारतावर गंभीर आरोप केले होते.

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या भारत-कॅनडा वाद काही केल्या शांत होत नसल्याचे दिसून येत आहे. याच दरम्यान जगातील काही महत्वाचे देश विभागले असल्याचे दिसून येत आहे. यादरम्यान मात्र, आपल्या शेजारील बांगलादेशाने त्यांची रोखठोक भूमिका जाहीर केली असून, त्यांनी भारत हा कॅनडापेक्षा वरचढ आणि भक्कम असल्याचे म्हटले आहे. तेव्हा बांगलादेशने आपले मित्रत्व सिद्ध केले आहे.(India is stronger than Canada This countrys stance on the Canada India dispute)

खलिस्तानी दहशतवादी निज्जर याच्या हत्येत भारताचा हात असू शकतो असा संशय व्यक्त करत कॅनडाचे पंतप्रधान टुडो यांनी भारतावर गंभीर आरोप केले होते. या वक्तव्यामुळे भारत आणि कॅनडामधील संबंध खराब झाले असून, त्याचे परिणाम जागतिक पातळीवर दिसून येत आहेत. याचा दरम्यान जगातील काही महत्वाच्या देशांनी आता एकमेकांची बाजू घेण्यास सुरूवात केल्याने दोन गटात जग विभागले जाते की काय? अशीही शक्यता यानिमित्ताने वर्तविल्या जात आहे.

- Advertisement -

काय म्हणाले बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री?

भारत आणि कॅनडामधील संघर्षावर आपली प्रतिक्रिया देताना बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री अब्दुल मोमेन म्हणाले की, कॅनडापेक्षा भारतच वरचढ आणि भक्कम आहे. भारताचा आम्हाला अभिमान आहे. भारत अपरिपक्व गोष्टी करत नाही. आम्ही भारताच्या बाजूने आहोत, अशा शब्दांत अप्रत्यक्षरित्या जस्टिन ट्रुडो यांना त्यांनी फटकारले आहे.

हेही वाचा : भगवद्गीता, रामचरितमानससारख्या धार्मिक ग्रंथांवर कोणीही हक्क सांगू शकत नाही; न्यायालयाचे मत, काय आहे प्रकरण?

- Advertisement -

भारताकडून उघडपणे कारवाई सुरू

खलिस्तानी दहशतवाद्यांना कॅनडात आश्रय देण्याच्या मुद्द्यावरून कॅनडासोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारची भूमिका अधिक कठोर झाली आहे. खलिस्तानी दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी सरकारने उघडपणे दहशतवाद्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. भारत सरकारच्या विनंतीवरून इंटरपोलने सोमवारी प्रतिबंधित दहशतवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनलचा सदस्य करणवीर सिंग याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे.

हेही वाचा : 50 गोळ्या झाडून हरदिपसिंग निज्जरची हत्या; व्हिडीओचा हवाला देत अमेरिकन वृत्तपत्राचे धक्कादायक दावे

जपान, श्रीलंका, बांगलादेश भारताच्या बाजूने तर…

भारत आणि कॅनडा दोन्ही देशातील संघार्षाबाबत जगातील महत्वाच्या देशांनी प्रतिक्रिया देऊ केली आहे. यामध्ये जपान, श्रीलंका आणि त्यानंतर आता बांगलादेशनेसुद्धा भारताची बाजू घेतली आहे. असे जरी असले तरी मैत्रित्वाचे गवगवा करणाऱ्या अमेरिकेने मात्र, भारताची बाजू घेतली नसून, त्यांनी कॅनडाची बाजू घेतली आहे. असे जरी असले तरी एका माजी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी अमेरिकेलाच घरचा आहेर देत, अमेरिकेची भूमिका योग्य नसल्याचे म्हटले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -