घरताज्या घडामोडीRajasthan MIG - 21 Crash: भारतीय वायूसेनेचे MIG-21 पुन्हा क्रॅश, जैसलमेरमध्ये मोठा...

Rajasthan MIG – 21 Crash: भारतीय वायूसेनेचे MIG-21 पुन्हा क्रॅश, जैसलमेरमध्ये मोठा अपघात

Subscribe

एका महिन्यात दुसऱ्यांदा वायू सेनेच्या लढाऊ विमानाचा अपघात

भारतीय वायूसेनेचे मिग -२१ या लढाऊ विमानाचा पुन्हा एकदा मोठा अपघात झाला आहे. गुरुवारी संध्याकाळी राजस्थानमधील जैसलमेरजवळ MIG-21 हे लढाऊ विमान क्रॅश झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विमानातील पायलचा शोध सुरू असून अद्याप पायलटबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. अपघात इतका मोठा आहे की याच पायलटचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

याआधी देखील मिग – २१ या विमानाचे अनेक अपघात झाले आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाचे एक लढाऊ विमान शुक्रवारी जैसलमेरमध्ये क्रॅश झाले. विमान साम पोलीस स्टेशन परिसरातील डेझर्ट नॅशनल पार्क येथे क्रॅश झाले. स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचले आहे, अशी माहिती जैसलमेरचे एसपी अजय सिंह यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि रुग्णवाहीका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. हे विमान जैसलमेर पाकिस्तान सीमेजवळ कोसळले आहेत. विमान ज्या ठिकाणी कोसळले आहे ते सुदासरी डेझर्ट नॅशनल पार्क आहे. विमान कोसळताच विमानाने पेट घेतल्याचे त्यांनी सांगितले.

लष्कराच्या लढाऊ विमानांच्या अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ८ डिसेंबर रोजी तमिळनाडूच्या कुन्नूर येथे लष्कराच्या MIG-17V5 या विमानाचा अपघात होऊन भारताचे सीडीएस बिपीन सिंह रावत यांच्यासह एकूण १४ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. एका महिन्यात दुसऱ्यांदा वायू सेनेच्या लढाऊ विमानाचा अपघात झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Bipin Rawat Chopper Crash : सीडीएस बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीची शेवटची इच्छा अपूरी

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -