घरदेश-विदेशभारतीय वनसेवेचा निकाल जाहीर

भारतीय वनसेवेचा निकाल जाहीर

Subscribe

भारतीय वन सेवेचा निकाल आज जाहीर झाला. देशभरातील ८९ उमेदवारांची निवड झाली असून महाराष्ट्रातील १० उमेदवारांचा यात यशस्वी झाले आहे.

भारतीय वन सेवेचा निकाल आज जाहीर झाला. देशभरातील ८९ उमेदवारांची निवड झाली असून महाराष्ट्रातील १० उमेदवारांचा यात यशस्वी झाले आहे. भारतीय वनसेवेसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने डिसेंबर २०१८ मध्ये मुख्य परिक्षा घेण्यात आली. या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची २८ जानेवारी २०१९ ते १ फेब्रुवारी २०१९ दरम्यान व्यक्तीमत्व चाचणी घेण्यात आली. यानुसार आज अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. देशभरातील ८९ उमेदवरांची निवड झाली असून महाराष्ट्रातील १० उमेदवारांचा यात समावेश आहे.

गुणांकन यादीनुसार महाराष्ट्रातील निवड झालेल्या उमेदवारांची नावे

देशातील ८९ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून यात महाराष्ट्रातील पुढील एकूण १० उमेदवारांचा समावेश आहे. श्रीकांत कुंडलीक खांडेकर(३३), अनिल रामदास म्हस्के (४९), जीवन मोहन दगडे (५६), चंद्रशेखर एस. परदेशी (५९), अनिकेत मारुती वानवे (६६), योगेश विलास कुलाल (६८), विक्रम सुरेश नाधे (७१) हर्षराज दिनकरराव वाठोळे (७७), पियुष अशोक गायकवाड (८५), धनंजय कुंडलीक वयभासे (८९).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -