घरमहाराष्ट्रदेवदर्शनासाठी जाणाऱ्या जीपला अपघात; २ जणांचा मृत्यू

देवदर्शनासाठी जाणाऱ्या जीपला अपघात; २ जणांचा मृत्यू

Subscribe

औसा - तुळजापूर महामार्गावरील बेलकुंडनजीकच्या टाका पाटीजवळ जीप आणि टँकरमध्ये समोरासमोर धडक झाली.

लातूरमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. देवदर्शनासाठी तुळजापूरला जाणाऱ्या जीपला अपघात झाला आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या जीप आणि टँकरची समोरासमोर धडक झाली. औसा – तुळजापूर महामार्गावर दुपारी २.३० च्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर ८ जण जखमी झाले. अपघातातील जखमींवर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अशी घडली घटना 

लातूरच्या शिरुर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ येथून कार्यक्रम आटोपून जीपमधील सर्वजण तुळजापूर येथे देवदर्शनासाठी निघाले होते. दरम्यान, उजनीहून बेलकुंडकडे भरधाव वेगात टँकर येत होता. औसा – तुळजापूर महामार्गावरील बेलकुंडनजीकच्या टाका पाटीजवळ जीप आणि टँकरमध्ये समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये अरुण कोयंडे (४२ वर्ष) आणि विवेक राजेशिर्के (४० वर्ष) या दोघांचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. तर मच्छिंद्र कल्याणकर (३५ वर्ष), मच्छिंद्र भालेकर (३७ वर्ष), संजय चव्हाण (३३ वर्ष), नितीन वाघमारे (३५ वर्ष), नितेश कतडदोड (३८ वर्ष) तसेच टँकरमधील हरिनारायण यादव, प्रमोद तिवारी आणि कपिल मुनी हे सर्व जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालय दाखल करण्यात आले आहेत. तर गंभीर जखमी झालेल्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – 

रस्ते अपघातातील मृत्युंचे प्रमाण वाढले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -