घरमनोरंजनअक्षय कुमारच्या बंगल्यात शिरणाऱ्या चाहत्याला अटक

अक्षय कुमारच्या बंगल्यात शिरणाऱ्या चाहत्याला अटक

Subscribe

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या बंगल्यात शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीची शिक्षा दिली आहे.

कोणत्याही परवानगी शिवाय बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या घरात शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चाहत्याला पोलिसांनी अटक केली आहे. तो भुवनेश्वर येथे वास्तव्यास आहे. तो मुंबईमध्ये अक्षय कुमारला भेटण्यासाठी आला होता. त्यामुळे त्याने अक्षय कुमारच्या बंगल्यात शिरण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याच हाच प्रयत्न त्याला महागात पडला आहे. तो स्वत:ला अक्षय कुमारचा मोठा फॅन असल्याचे सांगत आहे. दरम्यान, जुहू पोलिसांनी त्याला अटक करुन न्यायालयात हजर केलं असता त्याला न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. या चाहत्याचे नाव अंकित गोस्वामी असं आहे.

कोण आहे अंकित गोस्वामी?

अंकित गोस्वामी हा भुवनेश्वर येथे वास्तव्यास आहे. तिथे त्याचा दुधाचा व्यावसाय आहे. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तो अक्षय कुमारचा मोठा फॅन आहे. तो मुंबईत अक्षय कुमारला भेटण्यासाठीच आला होता.

- Advertisement -

सुरक्षा रक्षकांशी हुज्जत घातली

अक्षय कुमारला भेटण्यासाठी अंकित कोणत्याही परवानगी शिवाय बंगल्यामध्ये शिरला. त्याला सुरक्षा रक्षकांनी अडवण्याचा प्रयत्न केला. तर, त्याने सुरक्षा रक्षकांशी हुज्जत घातली. अखेर मुंबई पोलिसांना याप्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांशी त्याने वाद घालण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आणि न्यायालयात हजर केले. न्यायालयात त्याला न्यायालयी कोठडी ठोठावण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -