घरदेश-विदेशलीडरशीपमध्ये भारतीय तरुणी जगात आघाडीवर; अमेरिका, ब्रिटन, फ्रान्सलाही टाकले मागे

लीडरशीपमध्ये भारतीय तरुणी जगात आघाडीवर; अमेरिका, ब्रिटन, फ्रान्सलाही टाकले मागे

Subscribe

भारतीय तरुणींच्या कर्तृत्वाची नांगी जगभर गाजतेय. काही काळापासून भारतीय मुली जगभरात प्रत्येत क्षेत्रात नवनवीन विक्रम करत आहेत. त्यामुळे लीडरशीपमध्येही भारतीय तरुणी जगात आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे. यूएसए, यूके, जर्मनी आणि फ्रान्स देशांच्या तुलनेत भारतात मुली विज्ञान आणि तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या क्षेत्रात (STEM) चांगली कामगिरी करत आहेत.

सरकारने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांत पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या वाढली आहे. यात गेल्या तीन वर्षांत पुरुषांची संख्या १२.९ लाखांवरून ११.९ लाखांवर आली आहे, तर याच कालावधीत महिलांची संख्या १० लाखांवरून १०.६ लाख झाली आहे.

- Advertisement -

जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार, वेगवेगळ्या STEM मध्ये भारतीय महिलांची संख्या ४३ टक्के आहे. यात तर यूएस, यूके, जर्मनी आणि फ्रान्समध्ये मुलींची संख्या अनुक्रमे ३४ टक्के, ३८ टक्के, २७ टक्के आणि ३२ टक्के आहे.

लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या अतिरिक्त डीन आणि बायोइंजिनियरिंग-बायोसायन्सच्या प्रोफेसर डॉ. नीता राज शर्मा, यांनी सांगितले की, भारत सरकारच्या अनेक योजना जसे की किरण (नॉलेज इन्व्हॉल्व्हमेंट रिसर्च अॅडव्हान्समेंट थ्रू नर्चरिंग) आणि वुमन सायंटिस्ट स्कीम मुलींना विविध क्षेत्रात वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी उपयुक्त ठरल्या आहेत. त्याच वेळी, ऑनलाइन अभ्यासक्रम STEM शिक्षणाचा प्रचार करण्यासाठी खूप प्रभावी ठरत आहेत. महिलांच्या एज्युकेशनमध्ये सातत्याने होणारी वाढ देशाच्या प्रगतीसाठी उपयुक्त आहे.

- Advertisement -

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत उच्च शिक्षणासाठी STEM मध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी नॉलेज इन्व्हॉल्व्हमेंट रिसर्च अॅडव्हान्समेंट थ्रू नर्चरिंग सारख्या योजनांचा समावेश आहे. कार्यरत महिला शास्त्रज्ञांच्या बदलीचा प्रश्न सोडवण्यासाठी मोबिलिटी प्रोग्राम सुरू करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, भारतीय महिला शास्त्रज्ञ, अभियंत्यांना अमेरिकामधील प्रमुख संस्थांमध्ये ३ ते ६ महिन्यांच्या कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय सहयोगी संशोधनाची संधी देण्यासाठी इंडो-फेलोशिप सुरू करण्यात आली. विशेषत: ज्या भागात महिलांचे प्रतिनिधित्व कमी आहे त्याठिकाणी  STEM माध्यमातून स्त्रियांचा सहभाग वाढवण्यासाठी इयत्ता ९ ते १२ च्या गुणवंत विद्यार्थिनींसाठी विज्ञान ज्योती परीक्षा सुरू करण्यात आली आहे.

२०१९ ते २० मध्ये एकूण ३.८५ कोटी विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी नोंदणी केली. २०१८ ते १९ च्या तुलनेत ही संख्या ११.३६ लाखांनी (३.०४ टक्क्यांनी) वाढली आहे. २०१४ ते १५ मध्ये ही संख्या ३.४२ कोटी होती. २०१५ ते १६ आणि २०१९ ते २० दरम्यान उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या (एकूण नोंदणी दर) १८.२ टक्क्यांनी वाढली आहे. हे सर्वसाधारण नोंदणी दरातील ११.४ टक्के वाढीपेक्षा जास्त आहे. या तेजीमुळे देशातील उच्च शिक्षणात मुलींच्या नोंदणीचे प्रमाण आता २७.३ टक्क्यांवर पोहोचले आहे, तर मुलांचे नोंदणी प्रमाण २६.९ टक्के आहे.

कॉमर्स हे नवीन क्षेत्र म्हणून उदयास आले आहे ज्यामध्ये मुलींची संख्या वाढत आहे. २०१९ ते २० मध्ये देशभरात एकूण ४१.६ लाख विद्यार्थ्यांनी B.Com अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. त्यापैकी २१.३ लाख मुले आणि २०.३ लाख मुली होत्या. पाच वर्षांपूर्वीपर्यंत बी.कॉम.मध्ये १०० मुलांमागे ९० मुली होत्या, पण आता हे प्रमाण समान झाले आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -