घरदेश-विदेशIndian Railway : एसी आणि स्लीपर कोचमध्ये झोपण्याच्या वेळेत बदल; नाहीतर होणार...

Indian Railway : एसी आणि स्लीपर कोचमध्ये झोपण्याच्या वेळेत बदल; नाहीतर होणार कारवाई

Subscribe

Indian Railway : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी खासकरून रात्री प्रवास करणाऱ्यांसाठी ही बातमी महत्ताची आहे. भारतीय रेल्वेकडून (Indian Railway) रात्री झोपण्याच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. रात्री एसी (AC) आणि स्लीपर कोचमधून (Sleeper Coach) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जास्तीत जास्त 9 तास झोपू शकते होते, मात्र आता त्यांना 8 तासच झोपता येणार आहे. (Indian Railway Change in sleeping time in AC and sleeper coaches Otherwise action will be taken)

यापूर्वी एसी कोच आणि स्लीपरमध्ये रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत प्रवाशांना झोपण्याची परवानगी होती. पण रेल्वेकडून बदलण्यात आलेल्या नियमांनुसार आता प्रवाशांना रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंतच झोपता येणार आहे. म्हणजेच प्रवाशांना आता फक्त 8 तासच झोपता येणार आहे. भारतीय रेल्वेच्या ज्या गाड्यांमध्ये झोपण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, त्या सर्व गाड्यांमध्ये नवीन नियम लागू होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अल्पवयीन मुलीला कामावर ठेवले, मारहाण केली; लोकांनी महिला पायलट आणि तिच्या पतीला दिला चोप

सर्व प्रवाशांना चांगली झोप मिळावी यासाठी नियमात बदल

रात्री 10 ते सकाळी 6 ही वेळ झोपेसाठी चांगली मानली जाते. त्यामुळे या काळात सर्व प्रवाशांना चांगली झोप लागावी यासाठी नियमात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे एसी आणि स्लीपर कोचमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नवीन नियमांचे पालन करावे लागले. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून लोअर बर्थने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तक्रार  होती की, मधल्या बर्थवरील प्रवासी रात्री लवकर झोपतात आणि सकाळी उशिरापर्यंत उठत नाहीत. त्यामुळे खालच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांना त्रास होतो आणि याच कारणाने काही वेळा प्रवाशांमध्ये वादही होतात.

- Advertisement -

हेही वाचा – अरे वा, आता नंबर सेव्ह न करताच करा चॅटिंग, whatsapp नवीन फिचर सेवेत

…तर कारवाई होऊ शकते

प्रवाशी उशिरापर्यंत झोपतात या तक्रारी मिळाल्यानंतर रेल्वेने झोपण्याच्या नियमात आणि वेळत बदल केला आहे.  नवीन नियमानुसार, मधल्या बर्थवरील प्रवाशांना रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंतच झोपण्याची परवानगी देण्यात आली आहे. 6 वाजल्यानंतर मधल्या बर्थवरील प्रवाशाला बर्थ रिकामा करावा लागेल. नवीन नियमानुसार, मधल्या सीटवर झोपलेला प्रवाशाने सकाळी 6 वाजल्यानंतर बर्थ रिकामा केला नाही तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. याशिवाय नवीन नियमानुसार, खालच्या सीटवर आरक्षित तिकीट घेऊन प्रवास करणारे प्रवासी सकाळी 10 वाजण्यापूर्वी किंवा संध्याकाळी 6 नंतर त्यांच्या सीटवर झोपू शकत नाहीत. एखाद्या प्रवाशाने या नियमांचे उल्लंघन केल्यास रेल्वेकडे त्याच्याविरुद्ध तक्रार करता येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -