घरदेश-विदेशरोजगार देण्यात भारतीय संरक्षण मंत्रालय पहिल्या स्थानी; अमेरिका, चीनलाही टाकले मागे

रोजगार देण्यात भारतीय संरक्षण मंत्रालय पहिल्या स्थानी; अमेरिका, चीनलाही टाकले मागे

Subscribe

भारताचे संरक्षण मंत्रालय रोजगार देण्याच्या बाबतीत जगात आघाडीवर आहे. याबाबतीत भारताने अमेरिका आणि चीनलाही मागे टाकले आहे. यामुळे कर्मचारी संख्येच्या बाबतीत संरक्षण मंत्रालय हे जगातील इतर कोणत्याही संस्थेपेक्षा मोठे आहे. जर्मनीस्थित स्टॅटिस्टा इन्फोग्राफिकने याबाबत एक अहवाल सादर केला आहे. (Indians defence ministry is world biggest employer statista report)

या अहवालानुसार, भारतीय संरक्षण मंत्रालय 29.2 लाख लोकांना रोजगार देणारे जगातील सर्वात मोठे आहे. यामध्ये एकत्रित सक्रिया सेवा कर्मचारी, राखीव सैनिक आणि नागरी कर्मचारी यांचा समावेश आहे. जर्मनीस्थित स्टॅटिस्टा ही एक खाजगी संस्था आहे. जी जगभरातील विविध गोष्टींबाब डेटा आणि आकडेवारी प्रसिद्ध करते.

- Advertisement -

स्टॅटिस्टा इन्फोग्राफिक द्वारे 2022 मध्ये जगभरातील सर्वात मोठ्या कर्मचार्‍यांसह नियोक्त्यांबद्दल जारी केलेल्या अहवालानुसार, भारतीय संरक्षण मंत्रालयानंतर अमेरिकन संरक्षण विभाग हा दुसरा सर्वात मोठा रोजगाराची संधी देणाार विभाग आहे. अमेरिकेच्या संरक्षण खात्यात 2.91 लाख लोक काम करतात. याखालोखाल तिसऱ्या क्रमांकावर चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी(PLA) आहे. चीन संरक्षण विभागात 25 लाख जणांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. दरम्यान लष्करी खर्चाच्या बाबतीतही भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2021 मध्ये जागतिक लष्करी खर्च 2113 डॉलर अब्जपर्यंत वाढला आहे.

सर्वाधिक खर्च करणारे जगातील पाच देश

- Advertisement -

स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) नुसार, 2021 मध्ये पाच सर्वात मोठे खर्च देशांमध्ये अमेरिका, चीन, भारत, ब्रिटन आणि रशियाचा समावेश आहे. 2021 मध्ये अमेरिकने लष्करावर 80 दशलक्ष खर्च केला, तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा खर्च करणारा चीनने त्यांच्या लष्करासाठी अंदाजे 2093 दशलक्ष खर्च केला. दरम्यान SIPRI अहवालात म्हटले आहे की, भारताचा 766 दशलक्ष लष्करी खर्चासह जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.


गुजरातमध्ये लागू होणार समान नागरी कायदा? आज समिती स्थापनेबाबत घोषणेची शक्यता


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -