घरदेश-विदेशगुजरातमध्ये लागू होणार समान नागरी कायदा? आज समिती स्थापनेबाबत घोषणेची शक्यता

गुजरातमध्ये लागू होणार समान नागरी कायदा? आज समिती स्थापनेबाबत घोषणेची शक्यता

Subscribe

गुजरात निवडणुकीपूर्वी भाजप सरकार राज्यात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याची घोषणा करणार आहे. याबाबत गृह राज्यमंत्री हर्ष सिंघवी आज दुपारी घोषणा करण्याची शक्यता आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, गुजरातमध्ये सरकार समान नागरी कायदा लागू करण्यासाठी एक समिती स्थापन करेल. याबाबत प्रस्ताव शनिवारी मंत्रिमंडळात येऊ शकतो, उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश UCC वरील या समितीचे अध्यक्ष असतील.

स्थापन करण्याचा प्रस्ताव आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाऊ शकतो. गुजरातचे गृहमंत्री दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. ते याबाबत घोषणा करू शकतात, असे मानले जात आहे. याआधी भाजपने उत्तराखंड विधानसभा निवडणुकीच्या वेळी समान नागरी संहिता लागू करण्याची घोषणा केली होती, जी सरकार स्थापन झाल्यावर लागू करण्यात आली होती.

- Advertisement -

समान नागरी संहिता म्हणजे काय?

समान नागरी संहिता म्हणजे सर्व नागरिकांसाठी समान नियम. म्हणजेच भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकासाठी, धर्म किंवा जातीचा विचार न करता समान कायदा असेल. त्याच्या अंमलबजावणीवर, हाच कायदा विवाह, घटस्फोट, जमीन मालमत्तेच्या वितरणात लागू होईल, जो सर्व धर्माच्या लोकांना पाळणे बंधनकारक असेल.

समान नागरी संहितेचा भाजपच्या अजेंड्यात समावेश

2019 च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपने आपल्या जाहीरनाम्यात समान नागरी संहितेचा समावेश केला होता. हा एक मुद्दा आहे जो नेहमीच चर्चेत असतो. समान नागरी संहिता लागू झाल्यावरच लैंगिक समानता येईल, असा भाजपचा विश्वास आहे.


मुख्यमंत्र्यांनी राजकीय द्वेषापोटी विरोधी नेत्यांची सुरक्षा काढली; राष्ट्रवादीचा आरोप

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -