घरदेश-विदेशकॅनडानं भारताला पुन्हा डिवचलं; हत्येच्या आरोपानंतर आता म्हणे, जम्मू काश्मिरमध्ये...

कॅनडानं भारताला पुन्हा डिवचलं; हत्येच्या आरोपानंतर आता म्हणे, जम्मू काश्मिरमध्ये…

Subscribe

कॅनडा सरकारनं पुन्हा एकदा भारताला डिवचलं आहे. कॅनडातील नागरिकांनी एक ट्र‌ॅव्हल्स अॅडव्हायजरी जारी केली आहे. त्यात भारतातील केंद्र शासित प्रदेश असलेल्या जम्मू-काश्मीरचा प्रवास टाळण्याचा सल्ला क‌‌ॅनडीअन नागरिकांना दिला आहे.

खलिस्तान टायगर फोर्सचा नेता हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येवरून भारत आणि क‌ॅनडादरम्यान संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांनी परपस्परांच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. अशातच कॅनडा सरकारनं पुन्हा एकदा भारताला डिवचलं आहे. कॅनडातील नागरिकांनी एक ट्र‌ॅव्हल्स अॅडव्हायजरी जारी केली आहे. त्यात भारतातील केंद्र शासित प्रदेश असलेल्या जम्मू-काश्मीरचा प्रवास टाळण्याचा सल्ला क‌‌ॅनडीअन नागरिकांना दिला आहे. (International news Canada issues new travel advisory for India say avoid Jammu and kashmir )

कॅनडा भारत वाद कशावरून?

सोमवारी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी कॅनडीयन संसदेमध्ये भारतावर खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमध्ये सहभागी असल्याचा आरोप केला. त्यानंतर कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला कॅनडामधून भारतात परत पाठवलं. यानंतर भारतानं मंगळवारी परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून कॅनडाच्या भारतातील राजदुतांसोबत एक बैठक घेतली. या बैठकीनंतर भारतानं कॅनडाच्या राजदूतांना 5 दिवसांत देश सोडण्याचे आदेश दिले. यानंतर कॅनडाने थेट जम्मू- काश्मीरचा मुद्दा एका पत्रातून उपस्थित केला आहे.

- Advertisement -

काय दिलेत निर्देश?

कॅनडा सरकारने आपल्या नागरिकांना जम्मू-काश्मीरमध्ये न जाण्याचा सल्ला दिला आहे. यासंदर्भातील पत्रच कॅनडा सरकारने जारी केलं आहे. क‌ॅनडा सरकारने सुरक्षेसंदर्भातील कारणांचा संदर्भ देत कॅनडाच्या नागरिकांना जम्मू-काश्मीरचा दौरा टाळण्याच सल्ला दिला आहे. जम्मी-काश्मीरला जाऊ नका कारण त्याठिकाणी दहशतवाद, हिंसाचार, नागरिकांमध्ये अशांतता आणि अपहरण होण्याचा धोका आहे, असं कॅनडा सरकारने आपल्या नागरिकांना दिलेल्या इशाऱ्यामध्ये म्हटलं आहे. तसंच हा निर्देश केंद्रशासित असलेल्या लडाखसाठीही लागू आहेत, असं सरकारने स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: संसदेच्या विशेष अधिवेशनाचा तिसरा दिवस; विविध विधेयक मांडली जाणार; ‘या’ मुद्यांवरून गदारोळ होण्याची शक्यता )

निज्जर कोण होता?

45 वर्षीय हरदीप सिंग निज्जर हा प्रतिबंधित केटीएफचा ( खलिस्तान टायगर फोर्स) प्रमुख होता आणि भारताकडून सर्वाधिक शोध घेतल्या जाणाऱ्या दहशतवाद्यांपैकीच एक होता. त्याच्यावर 10 लाख रुपयांचे बक्षीस होते. पश्चिम कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतामधील सरे येथील गुरुद्वारात 18 जून रोजी दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -