घरदेश-विदेश'बाबरी विध्वंसाला २८ वर्षे झाली, आता हे प्रकरण मिटवा', पक्षकार इक्बाल यांची...

‘बाबरी विध्वंसाला २८ वर्षे झाली, आता हे प्रकरण मिटवा’, पक्षकार इक्बाल यांची विनंती

Subscribe

हे प्रकरण आता मिटवण्याची विनंती बाबरीचे पक्षकार इक्बाल अन्सारी यांनी कोर्टाला केली

बाबरी मशिदीचे पक्षकार इक्बाल अन्सारी यांनी सरकार आणि सीबीआय कोर्टाकडे बाबरी मशीदवरील खटला संपण्याची मागणी केली आहे. बाबरी विध्वंसाला २८ वर्षे झाली, आता तरी हे प्रकरण मिटवा अशी विनंती पक्षकार इक्बाल अन्सारी यांनी कोर्टाला केली आहे. दरम्यान, बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी ३० सप्टेंबरा लखनऊच्या विशेष सीबीआय कोर्ट निकाल देणार आहे. तर बाबरी मशीद पाडल्याप्रकरणात निकाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने लखनऊच्या विशेष सीबीआय कोर्टाला ३० सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवून दिली होती. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत बाबरी मशीद पाडण्यात आली होती.

- Advertisement -

बाबरी मशीद पाडल्या प्रकरणी येत्या ३० सप्टेंबरला लखनऊचे विशेष सीबीआय कोर्ट निकाल देणार आहे. निकालाच्या दिवशी न्यायाधीश एस.के.यादव यांनी लालकृष्ण आडवाणींसह सर्व आरोपींना कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान हे प्रकरण आता मिटवण्याची विनंती बाबरीचे पक्षकार इक्बाल अन्सारी यांनी कोर्टाला केली आहे.

इक्बाल अन्सारी यांनी कोर्टाला असे सांगितले की, ६ डिसेंबर १९९२ च्या प्रकरणाची सुनावणी संपविण्याची विनंती केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंदिराच्या बाजूने निकाल देऊन हिंदू-मुस्लिम मंदिर मशिदीतील वाद संपविला. तर सीबीआय प्रकरण अद्याप बाकी आहे. सरकारने याचा शेवट केला पाहिजे. बाबरी मशीद वाद प्रकरणातील काही लोक मरण पावले आहेत तर काही वृद्ध जिवंत आहेत. इक्बाल अन्सारी यांनी सरकारकडे ३० सप्टेंबर ही शेवटची तारीख असावी आणि हा विषय संपवण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

या प्रकरणात एकूण ३२ आरोपी आहेत. यात उप पंतप्रधान लालकृष्ण आडवाणी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, भाजपा नेते मुरली मनोहर जोशी, उमा भारती, विनय कटियार आणि साध्वी ऋतंभरा हे आरोपी आहेत. ६ डिसेंबर १९९२ रोजी कार सेवकांनी अयोध्येत मशीद पाडली होती. त्यावेळी लालकृष्ण आडवणी, मुरली मनोहर जोशी हे भाजपाचे वरिष्ठ नेते राम जन्मभूमी आंदोलनाचे नेतृत्व करत होते.


Babri Masjid Demolition Case: ३० सप्टेंबर रोजी लखनऊचे विशेष CBI कोर्ट देणार निकाल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -