घरताज्या घडामोडीvalentine day ला ISRO ची मोहिम फत्ते, PSLV-C52 च्या माध्यमातून 3 सॅटेलाईट...

valentine day ला ISRO ची मोहिम फत्ते, PSLV-C52 च्या माध्यमातून 3 सॅटेलाईट अंतराळात स्थापित

Subscribe

भारतीय अंतराळ संशोश संस्था (ISRO) ने आज पहाटे ५.५९ वाजता पोलार सॅटेलाईट लॉंच व्हेईकलच्या PSLV-C52 च्या माध्यमातून ऑर्बिटल मिशन यशस्वीपणे लॉंच केले. पीएसएलवी – सी ५२ ने तीन सॅटेलाईट अंतराळात स्थापित केल्या. त्यामध्ये एक रडार इमेजिंग सॅटेलाईटचा समावेश आहे. तर दुसरी सॅटेलाईट ही शेती आणि वनक्षेत्राच्या उद्देशाने पाठविण्यात आला आहे. आज सकाळी सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा येथील लॉंचपॅडमधून या सॅटेलाईट लॉंच करण्यात आल्या. या सॅटेलाईट पाठवण्याची इसरोची याआधीची मोहीम अपयशी ठरली होती. गेल्या वर्षी इसरोने या सॅटेलाईट लॉंच करण्याच्या प्रयत्नाचे मिशन अपयशी ठरल्याने इसरोचे मोठे नुकसान झाले होते. (ISRO pslv c-52 mission successfully placed three satellite in orbits on valentine day)

- Advertisement -

चार टप्प्यातील अंतराळ प्रवास

PSLV-C52 च्या माध्यमातून EOS-04 सॅटेलाईटला सूर्याच्या कक्षेत पोहचवण्यात आले आहे. PLSV ची ५४ वी उड्डाणाची ही कामगिरी आहे. तर PSOM-XL ks सोबतचे PSLV-XL च्या कॉन्फिग्रेशनमधील हे २३ वे मिशन आहे. PSLV हे ४४.४ मीटर लांब असे रॉकेट आहे. या रॉकेटने अंतराळातील प्रवास चार टप्प्यात पूर्ण केला. रॉकेटने ३२१ टन वजनासह उड्डाण केले. त्यामध्ये इंधनाच्या वजनाचाही समावेश आहे. या प्रवासात अंतराळात रॉकेटने एकुण २६३.३५ टन इंधन जाळले. या प्रवासात ३३ मिनिटात रॉकेट ५३८.२७ किलोमीटर इतके अंतर गाठले.

- Advertisement -

अंतराळात पाठवण्यात आलेले सॅटेलाईट कोणते

EOS-04  ही एक रडार इमेजिंग सॅटेलाईट आहे. त्यामध्ये हवामानाच्या उच्च गुणवत्तेच्या सॅटेलाईट तयार करण्यासाठी यांची डिझाइन करण्यात आली आहे. या फोटोचा उपयोग हा शेती, वन विज्ञान, वृक्षारोपण, पूर नियंत्रण, जमीनीतील आर्द्रता आणि जल विज्ञान यासारख्या क्षेत्रात सॅटेलाईटचा उपयोग होईल. या सॅटेलाईटचे आयुष्यमान १० वर्षे आहे.

INS-2TD तंत्रज्ञान क्षेत्रातील ही एक सॅटेलाईट आहे. भारत आणि भूटानचा संयुक्त (INS-2B) उपग्रह आहे. त्यामध्ये थर्मल इमेजिंग कॅमेराचा वापर करण्यात आला आहे. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या फोटोंमधून जमीन आणि पाण्याच्या पृष्ठभागावरील तापमान माहिती पडणार आहे. शेती तसेच वनक्षेत्रातही याचा उपयोग होऊ शकतो. या उपग्रहाकडून दिवसरात्र काम अपेक्षित आहे. सहा महिन्याचे या सॅटेलाईटचे आयुष्यमान आहे.

INSPIREsat-1 कोलोराडो विद्यापीठ, बोल्डर येथील IIST चा हा एक अध्ययनाचा उपग्रह आहे. या सॅटेलाईटचे आयुष्यमान एक वर्षाचे आहे.

गेल्यावर्षी लॉंचिंगमध्ये आले होते अपयश

PSLV-C52 चे प्रक्षेपण हे इसरोचे २०२२ सालातील पहिले मिशन आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातही या सॅटेलाईट लॉचिंगचा प्रयत्न झाला होता. पण तांत्रिक अडचणींमुळे अर्थ ऑब्झर्व्हेशन सॅटेलाईट EOS-03 नेमणे शक्य झाले नाही. परिणामी या मिशनमध्ये इसरोला अपयश आले. या मिशनच्या अपयशामुळे इसरोला मोठा फटकाही बसला.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -