Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Chandrayaan-3: चांदोमामाच्या अंगणात गोल गोल फिरतंय प्रज्ञान रोव्हर; नवीन व्हिडीओ आला समोर

Chandrayaan-3: चांदोमामाच्या अंगणात गोल गोल फिरतंय प्रज्ञान रोव्हर; नवीन व्हिडीओ आला समोर

Subscribe

इस्रोने जारी केलेल्या नवीन व्हिडीओमध्ये प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर गोल गोल फिरताना दिसत आहे. सुरक्षित मार्ग शोधत रोव्हर चांदोमामाच्या (Chandrayaan-3) अंगणात फिरत आहे. हे रोटेशन लँडरच्या इमेजर कॅमेऱ्याने टिपले आहे. ISRO ने X वर पोस्ट केलं आहे की जणू एक मूल चंदामामाच्या अंगणात खेळत आहे आणि आई प्रेमाने पाहत आहे.

इस्रोने जारी केलेल्या नवीन व्हिडीओमध्ये प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर गोल गोल फिरताना दिसत आहे. सुरक्षित मार्ग शोधत रोव्हर चांदोमामाच्या (Chandrayaan-3) अंगणात फिरत आहे. हे रोटेशन लँडरच्या इमेजर कॅमेऱ्याने टिपले आहे. ISRO ने X वर पोस्ट केलं आहे की जणू एक मूल चंदामामाच्या अंगणात खेळत आहे आणि आई प्रेमाने पाहत आहे. (ISRO Shared A video Chandrayaan 3 Pragyan rover circling in Chandomama s courtyard A new video is out)

चंद्रावर चांद्रयान- 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर आता प्रज्ञान रोव्हर आणि लँडर विक्रमनने नवीन फोटो शेअर केले आहेत. दरम्यान, आज पुन्हा इस्रोने लँडरने टिपलेला व्हिडीओ जारी केला आहे.

- Advertisement -

या व्हिडीओमध्ये रोव्हर एका खास स्टाइलमध्ये दिसत आहे. वास्तविक तो सुरक्षित मार्गाच्या शोधात चकरा मारत आहे. हे रोटेशन लँडर इमेजर कॅमेऱ्याने टिपले आहे. यावर इस्रोने X वर पोस्ट केले की, असे वाटत आहे की जणू एक मूल चांदोमामाच्या अंगणात खेळत आहे आणि आई प्रेमाने पाहत आहे.

चंद्रावर सापडलं सल्फर

यापूर्वी इस्रोने X (पूर्वीचे ट्विटर) वर विक्रम लँडरने प्रसिद्ध केलेला आणखी एक फोटो पोस्ट केला होता. यामध्ये, रोव्हर लेझर-इंड्युस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप (LIBS) उपकरणाद्वारे चंद्रावर नवीन घटक शोधताना दिसत आहे. इस्रोने सांगितले की या उपकरणाने आता चंद्रावर सल्फर असल्याची पुष्टी केली आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: महाराष्ट्राच्या पदरी पुन्हा निराशाच; स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लांबणीवरच )

विक्रम लँडरचा फोटोही घेतला होता

23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर उतरलेल्या विक्रम लॅंडर आणि प्रज्ञान रोव्हरकडून मिळालेली माहिती दररोज इस्रो त्यांच्या अधिकृत ट्वीटरवर शेअर करत आहे. रोव्हरवर बसवण्यात आलेल्या नेव्हिगेशन कॅमेऱ्याने 30 ऑगस्ट रोजी विक्रम लॅंडरचे छायाचित्र काढल्याचे इस्रोने सांगितले. इलेक्ट्रो ऑप्टिक्स सिस्टम्सच्या प्रयोगशाळेने हा विशेष कॅमेरा विकसित केला आहे. इस्रोने सांगितले की, रोव्हर प्रज्ञानने 30 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 7.35 वाजता हा फोटो घेतला आहे.

- Advertisment -