घरक्राइमMumbai Crime : पत्नीशी संबंध असल्याचा संशय; रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलाचे केले चार...

Mumbai Crime : पत्नीशी संबंध असल्याचा संशय; रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलाचे केले चार तुकडे

Subscribe

टेक्नॉलॉजीच्या काळात सर्व गोष्टी सहज होत अशतानाच दुसरीकडे मात्र, माणूस शीघ्रकोपी बनत चालला आहे. या शीघ्रकोपीपणामुळेच गुन्हेगारी वाढीस लागली आहे.

मुंबई : अनैतिक संबंधातून मागील काही महिन्यापूर्वीच मुंबईतील मीरारोड भागात एकाने त्याच्या लिव्ही इन पार्टनरची हत्या करून तुकडे कुकरमध्ये शिजवत असल्याची घटना घडली होती. या क्रुरतेने नंतर आता पुन्हा एक घटना मुंबईतील चेंबूर भागात घडली आहे. एका रिक्षा चालकाने त्याला असलेल्या संशयावरून एका अल्पवयीन मुलाची हत्या करून त्याच्या शरीराचे चार तुकडे केले. शफीक शेख असे आरोपीचे नाव असून, इश्वर मारवाडी उर्फ इश्वर ललित पुत्रान असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.(Mumbai Crime : Suspicion of relationship with wife; The rickshaw puller cut the minor into four pieces)

टेक्नॉलॉजीच्या काळात सर्व गोष्टी सहज होत अशतानाच दुसरीकडे मात्र, माणूस शीघ्रकोपी बनत चालला आहे. या शीघ्रकोपीपणामुळेच गुन्हेगारी वाढीस लागली आहे. नुसती गुन्हेगारी नाही तर यामध्ये क्रुरताही वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. दरम्यान मुंबईतील चेंबुरमधील म्हाडा वसाहतीत राहणाऱ्या आरोपी शफी अहमद अब्दुल माजिद शेख (32) या रिक्षाचालकाने ईश्वर मारवाडी उर्फ ईश्वर ललित पुत्रान या 17 वर्षीय युवकाची हत्या केली. या हत्येनंतर त्याने त्याच्या मृतदेहाचे चार तुकडे करून ते घरातच लपवले होते.

- Advertisement -

आरोपीने गाठला क्रुरतेचा कळस

मृत ईश्वर मारवाडी याच्या शरिराचे चार तुकडे करण्यात आले होते. त्याचे डोके, दोन हात कापले होते. सोमवारी ही हत्या करून दोन पिशव्यांमध्ये हात आणि डोके तर शरीर एका कपड्याने बांधून ठेवलं होतं. आरोपीने मयताचे पाय कापण्याचा प्रयत्नही केला पण तो करू शकला नाही.

पत्नी आणि मेहुणीशी लगट करत असल्याचे होता संशय

मृतक ईश्वर पुत्रान आणि आरोपी शफिक शेख याची पत्नी हे दोघे बहिण भाऊ होते. त्यांचे रक्ताचे नाते जरी नसले तरी मृत ईश्वर अनाथ असल्याने तो लहान असताना त्याची दया येऊन ललित पुत्रन यांनी त्याचा सांभाळ केला होता. ललित यांच्या एका मुलीचे लग्न हे आरोपी शफी अहमद याच्याशी 2020 साली झाले होते. मात्र शफीला ईश्वरचा स्वभाव खटकत होता.ईश्वर आपली पत्नी आणि सर्वात लहान मेहुणीशी लगट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा त्याला संशय होता. त्याने या आधी ईश्वरला धमकी दिली होती. यासंबंधी त्याने सासरे ललित पुत्रन यांनाही सांगितले होते. त्यानंतर त्यांने सोमवारी ईश्वरचा खून करून त्यांची हत्या केली होती.

- Advertisement -

असा झाला प्रकार उघड

दोन दिवसांपासून ईश्वर दिसत नाही यामुळे त्याचे वडील आणि आरोपीचे सासरे ललित पुत्रान यांनी शफीला त्याबद्दल विचारले. ईश्वरची हत्या करून त्याचे तुकडे करून किचनमध्ये ठेवल्याची कबुली शफीने दिली. ललित पुत्रन यांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर हा प्रकार समोर आला. सध्या आरोपी अटकेत असून, त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -