घरदेश-विदेशपक्ष्याच्या धडकेने विमानाचा युटर्न

पक्ष्याच्या धडकेने विमानाचा युटर्न

Subscribe

हवाई दलाच्या जॅग्वार या लढाऊ विमानाला पक्ष्याने धडक दिल्याने या विमानाचे तात्काळ लँडिंग करण्यात आले आहे.

हरयाणात आज सकाळी हवाई दलाच्या जॅग्वार लढाऊ विमानाला पक्ष्याने धडक दिल्याने या विमानाचे तात्काळ लँडिंग करण्यात आले. या लँडिंग दरम्यान विमानाचा काही भाग त्या परिसरात कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र, या दृर्घटनेमुळे कोणतीही हानी झाली नसल्याची माहिती हवाई दलाकडून स्पष्ट करण्यात आली आहे.

- Advertisement -

नेमके काय घडले?

हवाई दलाचे जॅग्वार या लढाऊ विमाने सकाळी अंबाला एअरफोर्सवरुन उड्डाण घेतले होते. विमानाच्या उड्डाणानंतर काही वेळातच एका पक्षाने विमानाला धडक दिली. या धडकेमुळे विमानाचे तात्काळ लँडिंग करण्यात आले आहे. यावेळी विमानाचे काही भाग त्या परिसरात कोसळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही हानी झाली नाही. यापूर्वी देखील दिल्लीहून मुंबईला येत असलेल्या इंडिगोच्या विमानाच्या इंजिनला पक्ष्याची धडक बसल्यानंतर विमानाच्या इंजिनामध्ये कंपन निर्माण झाल्याने हे विमान माघारी नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


हेही वाचा – ‘या’ कारणामुळे स्पाइसजेट विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

- Advertisement -

हेही वाचा – विमानात बॉम्ब असल्याचा निनावी फोन; विमानाचे इमर्जन्सी लँडिंग


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -