घरदेश-विदेश'या' कारणामुळे स्पाइसजेट विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

‘या’ कारणामुळे स्पाइसजेट विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

Subscribe

जयपूर विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्यावर या प्रवाशांना सुरक्षीतस्थळी हालवण्याते आले आहे.

दिवसेंदिवस विमान अपघात वाढ होत आहेत. बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास राजस्थानमधील जयपूर विमानतळावर स्पाइसजेट विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. दुबई-जयपूर एसजी -५८ या विमानात तांत्रिक बिघाड झाला. यामुळे या विमाने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. यावेळी इमर्जन्सी लँडिंग करताना विमानाचा टायर फुटला.


या विमानात १८९ प्रवासी होतो. हे सर्व प्रवासी सुरक्षीत आहेत. जयपूर विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्यावर या प्रवाशांना सुरक्षीतस्थळी हालवण्याते आले आहे. विमानतळावर सुरक्षा यंत्रणेकडून तपास सुरु आहे.

- Advertisement -

गेल्या आठवड्यात देखील अशाच प्रकारची घटना घडली होती. गो एअरच्या पाटमा-मुंबई विमानाचे औरंगाबादमध्ये चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. तांत्रिक बिघाडामुळे विमानाच्या इंडिनची गती मंदावली होती. त्यात विमानातील एसीही बंद झाला. यावेली वैमानिकाने प्रसंगावधान राखत इमर्जन्सी लँडिंग केले होते. या विमानात १६५ प्रवासी होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -