घरताज्या घडामोडीजम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षादलांची मोठी कारवाई, ३ दहशतवाद्यांना अटक

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षादलांची मोठी कारवाई, ३ दहशतवाद्यांना अटक

Subscribe

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात ३ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून सुरक्षादलांनी मोठी कारवाई केली आहे. सुरक्षा यंत्रणांनी हंदवाडा परिसरात एका अल्पवयीन मुलासह तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

हंदवाडा येथील फ्रूट मंडी क्रॉसिंगवर संयुक्त ब्लॉक तपासणी मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांनी तीन तरूणांना संशयास्पद स्थितीत पाहिले. तसेच पोलिसांनी चलान कापल्यानंतर तिघांनी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या तिघांनाही अटक करण्यात आल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली आहे.

- Advertisement -

सुरक्षा दलांनी त्यांच्याकडून एक पिस्तूल, एक पिस्तूल मॅगझिन, ७ गोळ्या आणि दोन हातबॉम्ब जप्त केले. तसेच हंदवाडा येथे दहशतवादी हल्ले करणे, लोकांना जखमी करून या परिसरातील शांतता बिघडवण्यासाठी या तिघांना काम देण्यात आले होते, असं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

- Advertisement -

गेल्या अनेक महिन्यांपासून जम्मू काश्मीरमधील नागरिकांना दहशतवांद्यांकडून टार्गेट केले जात आहे. मात्र, सुरक्षा दलांनाकडूनही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. १ ऑगस्ट रोजी जम्मू कश्मीरमधील बारामुल्ला येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एक दहशतवाद्याचा खात्मा केला होता.

यंदाच्या वर्षात सुरक्षा दलांनी ५५ चकमकीत १२५ दहशतवाद्यांना ठार केले आहे. तसेच दहशतवादी घटनांमध्ये २ सुरक्षा जवानांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर २३ जणं जखमी झाले आहेत. याव्यतिरिक्त जम्मू-काश्मीरमध्ये २० नागरिकांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. या वर्षात केंद्रशासित प्रदेशात आठ ग्रेनेड हल्ले झाले आहेत.


हेही वाचा : २४ तासांत राज्यात १८६२ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची नोंद, तर ७ रुग्णांचा मृत्यू


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -