घरदेश-विदेशईदच्या दिवशी काश्मीरमध्ये तणाव; दहशतवाद्यांनी केली महिलेची हत्या

ईदच्या दिवशी काश्मीरमध्ये तणाव; दहशतवाद्यांनी केली महिलेची हत्या

Subscribe

जम्मू-काश्मीरमध्ये ईदच्या दिवशी गोळीबार आणि दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. बुधवारी दहशतवाद्यांनी घरामध्ये घुसून एका महिलेची गोळ्या झाडून हत्या केली.

ईदच्या दिवशीच जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी गोळीबार करत एका महिलेची हत्या केली आहे. देशभरामध्ये ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे मात्र जम्मू-काश्मीरमध्ये ईदच्या दिवशी गोळीबार आणि दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. बुधवारी दहशतवाद्यांनी घरामध्ये घुसून एका महिलेची गोळ्या झाडून हत्या केली. तर या गोळीबारात एक जण जखमी झाला आहे. त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

- Advertisement -

अशी घडली घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी पुलवामा जिल्ह्यातील सिंगू-नरबाल भागामध्ये एका घरात घुसून अंदाधुंद गोळीबार केला. गोळी लागल्यामुळे एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर एक पुरुष गंभीर जखमी झाला आहे त्याच्यावर उपचार सुरु आहेत. गोळीबारात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव नगीना बानो असे आहे. २०१७ मध्ये दहशतवाद्यांनी नगीना बानो हिच्या पतीची देखील हत्या केली होती. तर जखमी झालेल्या व्यक्तीची ओळख मोहम्मद सुलतान अशी झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. पोलिसांनी परिसरामध्ये घेराव घालून सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.

सोमवारी एका तरुणाची हत्या

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भारतीय जवानांना तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले. या आधी सोमवारी रात्री श्रीनगरच्या खुनमोह येथे राहणाऱ्या मीर अहमद याची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. तो स्थानिक मशिदीमध्ये नमाज पठण करण्यासाठी गेला होता. नमाज पठणानंतर तो मशिदीच्या बाहेर आल्यानंतर बाईकवरुन आलेल्या दोन अज्ञातांनी त्याची गोळ्या झाडून हत्या केली.

- Advertisement -

जवानांवर दगडफेक

आज ईदच्या दिवशी श्रीनगरमध्ये नमाज पठणानंतर काही तरुणांनी जवानांवर दगडफेक केली. श्रीनगरच्या जामिया मशिदीच्या बाहेर जोरदार दगडफेक करण्यात आली. त्यानंतर दगडफेक करणाऱ्यांनी दहशतवादी जाकिर मूसा आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषीत झालेल्या मसूद अजहरच्या समर्थनामध्ये पोस्टर्स झळकवले. ऐवढेच नाही तर ‘काश्मिर बनणार पाकिस्तान’ अशा प्रकारच्या घोषणा देत पोस्टर्स झळकावले. यामध्ये दहशतवादी संघटना इसीसचे देखील पोस्टर्स होते.

हेही वाचा –  

जम्मू–काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक; २ दहशतवादी ठार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -