घरदेश-विदेशजगात ट्रॅफिकमध्ये 'मुंबई' पहिल्या; तर 'दिल्ली' चौथ्या क्रमांकावर

जगात ट्रॅफिकमध्ये ‘मुंबई’ पहिल्या; तर ‘दिल्ली’ चौथ्या क्रमांकावर

Subscribe

जगात ट्रॅफिकमध्ये मुंबई पहिल्या क्रमांकावर असून दिल्ली ही चौथ्या क्रमांकावर आहे.

मुंबई म्हटलं का डोळ्यासमोर दिसते ती मुंबईची प्रचंड ट्रॅफिक आणि या ट्रॅफिकमध्ये मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे. तर दिल्ली ही चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबईतील वाहतूक हा आता सार्वजनिक आणि सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. एकेकाळी शिस्तबद्ध सार्वजनिक वाहतुकीसीठी प्रसिद्ध असलेल्या मुंबई शहरात सध्याची सर्वत्र पसरत चाललेली वाहतूक कोंडी आता डोकेदुखी ठरत आहे. कारण जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडीचे शहर म्हणून मुंबईची ओळख झाली आहे. ‘टोमटोम ट्राफिक इंडेक्स २०१८’च्या सर्व्हेतून हा निष्कर्ष समोर आला आहे.

बोगोटा दुसऱ्या क्रमांकावर

जगभरातील ५६ देशांतील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या ४०३ शहरांचा सर्व्हेमध्ये अभ्यास करण्यात आला आहे. जगभरातील ४०३ शहरांमधील वाहतुकीचा वेग आणि वाहतूक कोंडीसंदर्भातील पाहणी करुन निरिक्षणे नोंदवली आहेत. या सर्वेतून मुंबईने नको त्या गोष्टीमध्ये अव्वल स्तान पटकावले आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर बोगोटा, तिसऱ्या क्रमांकावर लीमा तर चौथ्या क्रमांकावर दिल्लीचा तर पाचव्या क्रमांकावर मॉस्को या शहरांचा नंबर लागतो.

- Advertisement -

असे कापले जाते अंतर

मुंबईकरांना कोणतेही अंतर पार करण्यासाठी एकूण वेळेपेक्षा ६५ टक्के अधिक वेळ लागतो. तर दिल्लीत ५८ टक्के अधिक वेळ लागतो. मुंबईत एकेकाळी ८० टक्के असलेला हा सार्वजनिक वाहतुकीचा वाटा आजमितीला ६० ते ६५ टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. खासगी गाड्य़ा, दुचाकी वाहने, ऑटो, टॅक्सी यांचा २० टक्क्यांवरून आता ३५ ते ४० टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे.


हेही वाचा – मुंबईत ‘या’ ठिकाणी १०० टक्के पाणीकपात

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईत प्रथमच ‘वर्ल्ड ऑफ फिश’ मत्स्यप्रदर्शन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -