घरदेश-विदेशजम्मू–काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक; २ दहशतवादी ठार

जम्मू–काश्मीरच्या शोपियानमध्ये चकमक; २ दहशतवादी ठार

Subscribe

दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत चार दहशतवाद्यांना घेरण्यात जवानांना यश आले आहे.

जम्मू–काश्मीरच्या सीमा भागामध्ये दहशतवाद्यांच्या खुरापती सुरुच असतानाच पुन्हा एकदा दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना घेरले असून दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली असून दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. भारतीय लष्कराने परिसराला चारही बाजूने घेरले असून चार दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली आहे. या मिळालेल्या माहितीनुसार, शोपियानमधील सुगान परिसरात भारतीय लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्स (आरआर), सीआरपीएफ आणि एसओजीने मिळून ऑपरेशन सुरु केले आहे.

- Advertisement -

बारामुला जिल्ह्यातील सोपोरमधील डांगरपोरा येथे चकमकीत भारतीय जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले होते. यावेळी काही दहशतवादी अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच बुधवारी सुरक्षा दलांकडून शोपयान जिल्ह्यातील पिंजूरा गावात सुरु असलेल्या मोहिमेविरोधात हिंसा देखील भडकली होती. यामध्ये निदर्शन करणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू देखील झाला होता. तर २० जण जखमी झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -