घरदेश-विदेशअमेरिकेनंतर जपानने पाकिस्तानचे कान टोचले

अमेरिकेनंतर जपानने पाकिस्तानचे कान टोचले

Subscribe

दहशतवादा विरोधी कठोर कारवाई करण्याचे जपानने पाकला आवाहन केले आहे.

पाकिस्तानने दहशतवादा विरोधी कठोर कारवाई करावी, दहशतवाद्यांना आश्रय देऊ नये. अशा शब्दात पाकिस्तानला जपानने सुनावले आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री टारो कोनो यांनी काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा यावेळी निषेध केला आहे. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्थानच्या सिमेवर तणावपूर्ण वातावरण असून बिघडत्या परिस्थितीची चिंता असल्याच देखील त्यांनी म्हटल आहे. यावेळी हल्ल्याची जबाबदारी स्विकारलेल्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा देखील त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला. दरम्यान, जपानच्या आधी अमेरिकेने देखील भारता विरोधी कारवाई करुनये, दहशतवादा विरोधी पावले उचलावी असे पाकला सुनावले होते. तसेच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत जैशचा म्होरक्या असलेल्या मसूद अझरला दहशतवादी घोषीत करण्याच्या मागणीला ब्रीटन, अमेरिका, फ्रान्सने पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे पाकची जागतिक कोंडी होत आहे. अशात जपानने पाकला दहशातवादाविरोधी कारवाई कराण्यास केलेलं आवाहन महत्वाचं आहे.

चर्चा करण्याच आवाहन

जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यात भारतीय लष्कराचे जवान मारले गेले. त्याला प्रत्त्युत्तर देताना भारताने केलेल्या हवाई हल्ल्या नंतर दोन्ही देशांमधील परिस्ठिती अत्यंत नाजूक आहे. भारत आणि पाकिस्तानने कारवाया थांबवत चर्चा करुन या विषयावर तोडगा काढावा असे जपानचे परराष्ट्र मंत्री टारो कोनो म्हणाले आहेत.

- Advertisement -

जपान दौरा स्थगित

पाकिस्थानचे परराष्ट्र मंत्री महमूद कुरेशी २४ ते २७ फेब्रुवारी दरम्यान जपानच्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र सध्या पुलवामा हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्थान मध्ये तणावपूर्ण वातावरण असल्याने हा नियोजित दौरा रद्द करण्यात आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -