घरताज्या घडामोडीजेपी समूहाची सिमेंट उद्योगातून एक्झिट, दालमिया कंपनीसोबत केला कोटींचा करार?

जेपी समूहाची सिमेंट उद्योगातून एक्झिट, दालमिया कंपनीसोबत केला कोटींचा करार?

Subscribe

जेपी समुहाने सिमेंट उद्योगातून एक्झिट घेतलं आहे. तसेच दालमिया सिमेंट कंपनीसोबत कोटींचा करार केला आहे. जवळपास हा करार ५६६६ कोटी रुपयांसाठी झाला असून या कंपनीसोबत व्यवसाय विक्रीचा करार केला आहे.

जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेड (JAL) आणि त्यांच्या समूह कंपन्यांनी सोमवारी दालमिया भारत लिमिटेडला ५६६६ कोटी रुपयांच्या इंटरप्राइझ मूल्यावर उर्वरित सिमेंट मालमत्ता विकण्याची आणि कर्ज कमी करण्याच्या धोरणाचा भाग म्हणून या क्षेत्रातून बाहेर पडण्याची घोषणा केली.

- Advertisement -

दालमिया भारताची उपकंपनी दालमिया सिमेंटने जयप्रकाश असोसिएट्सचे सिमेंट, क्लिंकर आणि पॉवर प्लांट्स घेण्यासाठी आज करार केला आहे. ऑक्टोबर महिन्यात जयप्रकाश असोसिएट्स आणि जयप्रकाश पॉवर व्हेंचर्सने कर्ज कमी करण्यासाठी त्यांच्या सिमेंट व्यवसायासह काही नॉन-कोअर मालमत्ता विकण्याची योजना जाहीर केली. या कंपनीचे प्रकल्प मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड येथे आहेत.

जेपी ग्रुपच्या ५० टक्केपेक्षा जास्त सिमेंट क्षमता मध्य भारतीय बाजारपेठेत आहे. जयप्रकाश असोसिएट्स सिमेंट प्रकल्पाची विक्री करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. दालमिया सिमेंटसाठी हे अधिक फायद्याचे मानले जात आहे. त्यामुळे दालमियासाठी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये बाजारपेठ खुली होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : सीमाभागातील ११ गावांची मोठी पंचायत, गटविकास अधिकाऱ्यांकडून खुलासा सादर करण्याची


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -