Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी JEE Main Result 2021: जेईई मेनचा निकाल जाहीर, १८ विद्यार्थ्यांना मिळाला रँक...

JEE Main Result 2021: जेईई मेनचा निकाल जाहीर, १८ विद्यार्थ्यांना मिळाला रँक १; इथे पाहा निकाल

Related Story

- Advertisement -

जेईई मेन २०२१ सेशन ४चा निकाल (jee main session 4 result) मंगळवारी रात्री उशीरा जाहीर झाला आहे. या सत्रामध्ये ४४ विद्यार्थ्यांना १०० टक्के मिळाले आहेत. तर १८ विद्यार्थ्यांनी रँक १ मिळवला आहे. यावर्षी ७.३२ लाख विद्यार्थ्यांनी जेईई मेनची परीक्षा दिली होती. जेईई मेन २०२१ मधील टॉप विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राचा अर्थव अभिजीत तांबट याचे नाव आहे.

या विद्यार्थ्यांनी केले टॉप

- Advertisement -

२ सप्टेंबरला जेईई मेन २०२१ सेशन ४ची परीक्षा संपली होती. विद्यार्थी ८ सप्टेंबरपर्यंत प्रोव्हिजनल आन्सर कीवर आक्षेप घेऊ शकत होते. त्यानंतर प्रोव्हिजनल आन्सर की जारी करण्यात आली. तेव्हापासून जेईई मेन्स २०२१चा निकाल jeemain.nta.ac.inवर प्रतिक्षित होता.

जेईई मेन २०२१चा निकाल असा पाहा

स्टेप १ – सर्वात पहिल्यांदा अधिकृत वेबसाईट jeemain.nta.nic वर जा.
स्टेप २ – जेईई मेन २०२१ सत्र ४ वर क्लिक करा.
स्टेप ३ – मग परीक्षा सत्र, अर्ज क्रमांक, जन्मतारिख टाका.
स्टेप ४ – त्यानंतर जेईई मेन २०२१ निकालाची कॉपी डाउनलोड करा.

- Advertisement -

माहितीनुसार, बीई/ बीटेकसाठी जेईई मेन पेपर १मध्ये गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र सामिल आहे. तर पेपर २ मध्ये गणित, अॅप्टीट्यूड आणि चित्रकला हे सामिल असतात. प्रश्न चार-चार मार्कसाठी मल्टीपल च्वाइस आणि न्यूमारिकल बेस्ट असतात. मल्टीपल च्वाइस प्रश्नांमध्ये चुकीचे उत्तर दिल्यास एक गुण कमी होणे, असे निगेटिव्ह मार्किंग केली जाते.


हेही वाचा – JEE advanced 2021 : जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचे रजिस्ट्रेशन आजपासून सुरु, जाणून घ्या डिटेल्स


- Advertisement -