घरताज्या घडामोडीभूत उतरवण्यासाठी महिलेला मारहाण केली, पण झालं भलतच...!

भूत उतरवण्यासाठी महिलेला मारहाण केली, पण झालं भलतच…!

Subscribe

सोमवारी झारखंडच्या गिरीडीह जिल्ह्यात  एक विचीत्र प्रकार घडला. गावातील काही जणांनी महिलेला भूत समजून जबर मारहाण केली. या प्रकरणाची कसून चौकशी सध्या सुरू आहे. अशी माहिती गिरीडीह येथील खोरीमहुआचे उपविभागीय पोलिस अधिकारी नवीन कुमार सिंह (एसडीपीओ) यांनी दिली. या संदर्भात कोणताही एफआयआर दाखल केलेला नाही.

गावातील काही लोकांनी या महिलेला एक दिवशी आपल्या घरी बोलावून घेतलं आणि महिलेतील भूत उतरवण्यासाठी जबर मारहाण केली. या मारहाणीत या महिलेचा मृत्यू झाला. ही महिला भूत आहे. ती लोकांवर जादूटोणा करते असं या लोकांच म्हणणं होतं. त्यामुळे त्या महिलेला मारहाण करून तीला मारण्यात आले.

- Advertisement -

मात्र मृताच्या घरातील लोकांनी असा आरोप केला की,  महिलेला गावातील काही लोकांनी घरी बोलवून मारहाण केली. या महिलेचा खून केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. कुटुंबियांनी जुन्या भांडणातून ही मारहाण झाल्याचे पोलिसांनी सांगितले. ही हत्या आहे की आणखी काही याचा तपास पोलीस सध्या करत आहेत. नवीन कुमार सिंह या प्रकरणाचा तपास करत आहे.


हे ही वाचा – दिल्लीत गुंडांचा हैदोस; हवेत गोळीबार तर लहान मुलांना बेदम मारहाण

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -