घरताज्या घडामोडीCorona Vaccine: रशियात 'स्पुटनिक व्ही' लस घेण्यास ५० टक्के डॉक्टरांचा नकार!

Corona Vaccine: रशियात ‘स्पुटनिक व्ही’ लस घेण्यास ५० टक्के डॉक्टरांचा नकार!

Subscribe

रशियाचे आरोग्यमंत्री मिखाइल मुराश्को यांनी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वात पहिल्यांदा ही कोरोना लस दिली जाऊ शकते असे सांगितले होते.

काही दिवसांपूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी जगातील पहिली कोरोनाची लस विकसित झाल्याचा दावा केला. इतकेच नाही तर त्यांनी ही रशियाची कोरोना लस आपल्या मुलीलाही देण्यात आल्याचे पुतिन यांनी सांगितले. तसेच कोरोना विषाणूशी लढत असलेले डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वात पहिल्यांदा कोरोना लस दिली जाऊ शकते, असे रशियाचे आरोग्यमंत्री मिखाइल मुराश्को यांनी यापूर्वी सांगितले होते. पण जगातील पहिली कोरोनाची लस ‘स्पुटनिक व्ही’ (Sputnik V) घेण्यास रशियातील निम्माहून अधिक डॉक्टर तयार नसल्याचे समोर आले आहे.

रशियाची पहिली कोरोनाची लस ‘स्पुटनिक व्ही’ गॅमलेई रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ एपिडेमिओलॉडी अँड मायक्रोबायोलॉजीने तयार केली आहे. रशियाची ही लस किती सुरक्षित आहे याबाबत काळजी व्यक्त होत असून मान्यता मिळवण्याकरिता वेगाने काम सुरू केले आहे. रशियाची कंपनी सिस्टेमाने लसीचे उत्पादन सुरू केले आहे. या लसीची पहिली बॅच उत्पादित केली असून ऑगस्टच्या अखेरीस ती उपलब्ध करून द्यायची आहे. पण रशियातील दोनपैकी एक डॉक्टर (५२ टक्के) म्हणाला की, आम्ही ‘स्पुटनिक व्ही’ कोरोना लस घेणार नाही, याबाबतचे वृत्त आरबीसी न्यूज संकेतस्थळाने दिले असून त्यांनी ऑनलाईन पाहणी केलेला हवाल देखील वृत्तात दिला आहे.

- Advertisement -

रशियाच्या लसीबाबत झाला हा खुलासा

रशियन कोरोना लसीची फक्त ३८ लोकांवर चाचणी केली आहे. यानंतर या रशियन लसीला मंजूरी देण्यात आली आहे, असा खुलासा रशियाच्या अधिकृत दस्तऐवजांचा हवाला देत डेली मेल रिपोर्टमध्ये केला आहे.फोंटंका (Fontanka) न्यूज एजन्सीनुसार, रशियाच्या कोरोना लसीचे साइड इफेक्ट्स झाले आहेत. वेदना होणे, सूज येणे, जास्त ताप येणे, असे साइड इफेक्ट्स झाले आहे. त्याचबरोबर कमकुवतपणा येणे, एनर्जी कमी होणे, भूक न लागणे, डोकेदुखी होणे, अतिसार, नाक बंद होणे, घसा खराब होणे आणि नाक वाहणे असे साइड इफेक्ट्सची नोंद केली आहे.


हेही वाचा – चिंताजनक! WHO ने दिले संकेत; दातांच्या डॉक्टरांना कोरोनाचा धोका जास्त

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -