घरदेश-विदेशJob Alert: गेल (इंडिया) लिमिटेड आणि महाराष्ट्र दूरसंचार विभागात विविध पदांसाठी भरती

Job Alert: गेल (इंडिया) लिमिटेड आणि महाराष्ट्र दूरसंचार विभागात विविध पदांसाठी भरती

Subscribe

गेल (इंडिया) लिमिटेडमध्ये विविध पदांच्या 220 जागांसाठी आणि महाराष्ट्र दूरसंचार विभागात 33 जागांसाठी भरती होत असल्याची महत्वपुर्ण माहिती समोर येत आहे.

गेल्या वर्षभरात कोरोना व्हायरसच्या संकटामुळे अनेक लोकांना बरोजगारीमुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. लॉकडाउन दरम्यान अनेकांना नोकरी गमवावी लागली. आता भारतात कोरोनाचे सावट कमी होताना दिसत आहे. अशातच अनेक रिक्त झालेली पदे भरण्याकरीता अनेक ठीकाणी लोकांसाठी कामाच्या नव-नवीन संधी उपलब्ध होत आहेत. याचदरम्यान,गेल (इंडिया) लिमिटेडमध्ये विविध पदांच्या 220 जागांसाठी आणि महाराष्ट्र दूरसंचार विभागात 33 जागांसाठी भरती होत असल्याची महत्वपुर्ण माहिती समोर येत आहे. तर या नोकरीसाठी तुम्ही कसा अर्ज कराल तसेच एकूण पदसंख्या किती आहे. आशा अनेक प्रश्नांचे निरसण तसेच भरती बाबत संपुर्ण माहिती पुढिलप्रमाणे देण्यात आली आहे.

गेल (इंडिया) लिमिटेड आणि महाराष्ट्र दूरसंचार विभागातील नोकरीसाठी कसा करणार अर्ज?

गेल (इंडिया) लिमिटेड- एकूण पदसंख्या 220
(संपूर्ण देशभरात ही भरती करण्यात येणार आहे.)

- Advertisement -

पदाचे नाव – वरिष्ठ अभियंता
एकूण जागा – 115
शैक्षणिक पात्रता – इंजिनिअरिंग पदवी, 1 वर्षाचा अनुभव

पदाचे नाव – वरिष्ठ अधिकारी
एकूण जागा – 69
शैक्षणिक पात्रता – इंजिनिअरिंग पदवी/ MBA /CA /CMA /LLB, 1 वर्षाचा अनुभव

- Advertisement -

पदाचे नाव – व्यवस्थापक
एकूण जागा – 17
शैक्षणिक पात्रता – CA/ CMA (ICWA)/ पदवीधर/ MBA / इंजिनिअरिंग पदवी, 4 वर्षांचा अनुभव

पदाचे नाव– अधिकारी
एकूण जागा – 19
शैक्षणिक पात्रता – M.Sc/ पदवीधर आणि 3 वर्षांचा अनुभव

उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीन अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्यासाठी उमेदवाराने अधिकृत वेबसाईट – www.gailonline.com वर भेट द्यावी. तसेच वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर careers मध्ये applying to gail या ऑप्शनवर क्लिक करा. सुरुवातीलाच तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातली काही जाहीरातींच्या लिंक दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला संबधीत पोस्ट बाबत सविस्तर माहिती मिळेल. तसेच अर्ज कऱण्याची शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2021 आहे.

किती असणार पगार

वरिष्ठ अभियंता पदासाठी – 60 हजार ते 1 लाखा 80 हजार
वरिष्ठ अधिकारी – 60 हजार ते 1 लाखा 80 हजार
व्यवस्थापक – 70 हजार ते 2 लाखांपर्यत
अधिकारी – 50 हजार ते 1 लाख 60 हजार

महाराष्ट्र दूरसंचार विभाग

पदाचे नाव – वरिष्ठ लेखापाल, कनिष्ठ लेखापाल, लोअर डिव्हिजन लिपिक आणि एमटीएस.

एकूण जागा – 33

नोकरीचं ठिकाण – गोवा, मुंबई

अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी आहे- [email protected]

अधिकृत वेबसाईट – dot.gov.in

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2021



हे हि वाचा – प्रत्येक कुटुंबाला ३०० युनिट मोफत वीज; जुनी बिल माफ, कोणतीही वीज कपात नाही; उत्तराखंडमध्ये केजरीवालांचे वचन



 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -