घरट्रेंडिंगGDS Recruitment 2021: ग्रामीण डाक सेवकांच्या पदांसाठी त्वरीत करा अर्ज; जाणून घ्या...

GDS Recruitment 2021: ग्रामीण डाक सेवकांच्या पदांसाठी त्वरीत करा अर्ज; जाणून घ्या सविस्तर

Subscribe

भारतीय डाक विभागाच्या बिहार सर्कलने ग्रामीण डाक सेवक या पदासाठी १ हजार ९४० जागांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढविली आहे. ज्या उमेदवारांनी आता अर्ज केलेले नाही त्यांना १४ जुलै २०२१ पर्यंत अर्ज करण्याची संधी आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २७ एप्रिलपासून सुरू झाली आणि २६ मे २०२१ पर्यंत सुरू होती. परंतु नंतर डाक विभागाने अर्जाची अंतिम तारीख ३० जूनपर्यंत वाढविली आणि आता या तारखेत पुन्हा एकदा वाढ केली असून अंतिम तारीख १४ जुलैपर्यंत असणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात येत आहे. या नव्या सूचनेनुसार, उमेदवार १४ जुलै २०२१ पर्यंत अर्ज करू शकणार आहेत. १४ जुलै नंतर ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक इनअॅक्टिव्ह करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला जीडीएसच्या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही शक्य तितक्या लवकर इंडिया पोस्टच्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकता.

अर्जदाराची आवश्यक पात्रता

शैक्षणिक पात्रता

ग्रामीण डाक सेवक ऑफ इंडिया पोस्टसाठी हायस्कूल झालेले तरूण अर्ज करू शकतात. परंतु हायस्कूलमध्ये उमेदवारांचे गणित आणि इंग्रजी विषय असणे आवश्यक आहे.

- Advertisement -

वयाची मर्यादा

ग्रामीण डाक सेवक ऑफ इंडिया पोस्टसाठी अर्जदारांचे वय १८ ते ४० वर्षे असणे आवश्यक आहे.

असा करा अर्ज

  • इंडिया पोस्ट http://appost.in/gdsonline/ च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • अर्ज करण्यासाठी होमपेजवर दिलेल्या स्टेप्सला फॉलो करा.
  • स्वत:ची नोंदणी करा आणि सर्व आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
  • भविष्यातील संदर्भासाठी नोंदणी क्रमांक नोंदवा.
  • अर्ज फी भरा.
  • अर्ज भरा आणि सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  • भविष्यातील संदर्भासाठी हार्ड कॉपी तुमच्या ठेवा.

अर्ज शुल्क

यूआर / ओबीसी / ईडब्ल्यूएस पुरुष / ट्रान्स मेलच्या उमेदवारांना अर्ज फी म्हणून १०० रुपये द्यावे लागणार आहे. एससी / एसटी, पीडब्ल्यूडी प्रवर्ग आणि ट्रान्स महिला व महिला उमेदवारांना अर्ज शुल्कात सूट देण्यात आली आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -