घरदेश-विदेश'जॉन्सन' बेबी पावडरमुळे होतो कर्करोग?

‘जॉन्सन’ बेबी पावडरमुळे होतो कर्करोग?

Subscribe

'जॉन्सन' बेबी पावडरमध्ये अॅस्बेस्टॉस हा घातक घटक वापरला जात असून यामुळे कर्करोग होत असल्याचे वृत्त रॉयटर्न यांने केले आहे.

नवजात बालकांसह लहान मुलांना सर्रास वापरली जाणारी पावडर म्हणजे ‘जॉन्सन बेबी पावडर’. ही पावडर नवजात बालकांसह सर्वच लहान मुलांना लावण्यात येते. मात्र ‘जॉन्सन बेबी पावडर’ आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. या ‘जॉन्सन बेबी पावडर’मध्ये घातक असे अॅस्बेस्टॉस असल्याची माहिती समोर आली आहे. हा घटक घातक असल्याचे माहिती असून देखील ‘जॉन्सन’ कंपनी याचा अनेक दशकांपासून वापर करत असल्याचे वृत्त रॉयटर्न यांनी दिले आहे. अॅस्बेस्टॉसमुळे कर्करोग होण्याची शक्यता असते. दरम्यान, रॉयटरचे हे वृत्त एकतर्फी आणि चुकीचे असल्याचे स्पष्टीकरण जॉन्सन कंपनीने केले आहे.

काय म्हटले आहे या वृत्तात

रॉयटर्सने काही कागदपत्रे आणि पुराव्यांच्या आधारावर आपल्या वृत्तात असे म्हटले आहे की, बेबी पावरमध्ये अॅस्बेस्टॉस हा घातक घटक असल्याचे जॉन्सन कंपनीला, कंपनीच्या अधिकाऱ्याना, खाण व्यवस्थापक, वैज्ञानिक, डॉक्टर्स आणि वकिलांना देखील माहित आहे. मात्र तरी देखील यापैकीकोणीही ही माहिती समोर आणत नाही आणि जगजाहीर देखील करत नाही. आपल्याला मिळालेल्या कागदपत्रांची तसेच अन्य पुराव्यांची तपासणी केली असता साधारण १९७१ पासून ते २००० पर्यंत जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी पावडरच्या कच्च्या मालात तसेच विक्रीसाठी बाजारात आलेल्या बेबी पावडरमध्ये अॅस्बेस्टॉस असल्याचे आढळले होते. असे या वृत्तात म्हटले आहे. तसेच जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीची पावडर वापरल्यामुळे कर्करोग झाल्याचा दावा करीत अनेकांनी कंपनीविरोधात खटलाही दाखल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -