घरमुंबईअनिल अंबानीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसने लावले 'राफेल चोर' पोस्टर

अनिल अंबानीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसने लावले ‘राफेल चोर’ पोस्टर

Subscribe

राफेल लढाऊ विमान खरेदीप्रकरणी सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. मात्र तरिही आम्ही आमच्या आरोपावर ठाम असल्याचे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले. त्यानंतर आता काँग्रेस कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले असून मुंबईतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी अनिल अंबानी यांच्या सांताक्रुझ येथील कार्यालयाच्या बाहेर ‘राफेल चोर’ पोस्टर चिटकवले आहेत. या पोस्टरवर अनिल अंबानी आणि राफेल विमानाचा फोटो असून त्यावर राफेल चोर असे लिहिलेले आहे. हे पोस्टर काल रात्री लावण्यात आले, अशी माहिती मिळत आहे. मात्र त्यानंतर लगेचच कंपनीच्या सुरक्षारक्षकांनी त्वरीत पोस्टर काढून टाकली आहेत.

हे वाचा – राफेल करार घोटाळा – राहुल गांधींनी शोधून काढली ‘ही’ चूक!

मुंबई काँग्रेसने लावली पोस्टर

सध्यातरी हे पोस्टर रिलायन्स कंपनीकडून काढून टाकण्यात आली आहेत. या पोस्टरवर एका कोपऱ्यात मुंबई काँग्रेस असेले लिहिले होते. त्यावरूनच हे काम काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे होते, असे दिसते. राहुला गांधी आपल्या आरोपांवर ठाम राहिल्यामुळेच काँग्रेस कार्यकर्तेही अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

- Advertisement -
राफेल घोटाळा : सरकार म्हणतंय ‘ती’ आमची टायपिंग मिस्टेक!

 

राफेल कराराबाबत सर्वोच्च न्यायालयाने घोटाळ्याबाबतच्या सर्व याचिका निकाली काढत सरकारला क्लीनचिट दिली. मात्र त्यानंतर राहुल गांधींनी या निकालातल्या एका महत्त्वाच्या गोष्टीवर बोट ठेऊन खळबळ उडवून दिली. राफेल खरेदी प्रकरणाचा अहवाल कॅग आणि पीएसी अर्थात पब्लिक अकाऊंट कमिटीकडे सादर करण्यात आला होता, असे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रात नमूद करण्यात आले. मात्र, ‘हा अहवाल कॅग आणि पीएसीकडे गेलाच नाही’ असा खळबळजनक दावा राहुल गांधी यांनी केला आहे. यासाठी त्यांनी पीएसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनाच पत्रकार परिषदेमध्ये आणले होते. त्यानंतर सरकारने आपली चूक मान्य केली असून सुधारीत प्रतिज्ञापत्र पुन्हा एकदा न्यायालयात सादर करु असे सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -