घरदेश-विदेशJulio Ribeiro : 'पाकिस्तानात हिंदू-ख्रिश्चनांना दुय्यम नागरिकत्व, तिच स्थिती भारतात होणार'; रिबेरोंच्या...

Julio Ribeiro : ‘पाकिस्तानात हिंदू-ख्रिश्चनांना दुय्यम नागरिकत्व, तिच स्थिती भारतात होणार’; रिबेरोंच्या वक्तव्याने भाजप संतप्त

Subscribe

गोव्यामध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना माजी आयपीएस अधिकारी ज्युलिओ रिबेरा म्हणाले होते की, पाकिस्तानमध्ये ज्या प्रकारे हिंदू आणि ख्रिश्चन यांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते, तशीच परिस्थिती भारतातही येऊ शकते. रिबेरो यांच्या या विधानावर गोवा भाजपने तीव्र आक्षेप नोंदवला असून या विधानातून त्यांचा राजकीय पक्षपात दिसून येतो.

नवी दिल्ली : भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर परखड भाष्य करण्यात आलं आहे. हे भाष्य करण्याचा धाडस केलं आहे ते माजी आयपीएस अधिकारी आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्यूलिया रिबेरो यांनी. मात्र, त्यांनी केलेल्या भाष्यानंतर त्यांच्यावर भाजकडून टीका केली जात आहे. (Julio Ribeiro Secondary citizenship for Hindu-Christians in Pakistan same situation will happen in India BJP angry with Ribeiro’s statement)

गोव्यामध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना माजी आयपीएस अधिकारी ज्युलिओ रिबेरो म्हणाले होते की, पाकिस्तानमध्ये ज्या प्रकारे हिंदू आणि ख्रिश्चन यांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते, तशीच परिस्थिती भारतातही येऊ शकते. रिबेरो यांच्या या विधानावर गोवा भाजपने तीव्र आक्षेप नोंदवला असून या विधानातून त्यांचा राजकीय पक्षपात दिसून येतो. 5 मे 1929 रोजी बॉम्बे (आताची मुंबई) येथे जन्मलेल्या ज्युलिओ रिबेरो यांची गणना देशातील एक कणखर आणि दिखाऊ अधिकारी म्हणून केली जाते. मुंबई पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी केलेले काम आजही स्मरणात आहे. एवढेच नाही तर पंजाबचे डीजीपी म्हणून त्यांनी दहशतवादाविरुद्ध गोळीला गोळीनेच उत्तर असे धोरण अवलंबिले होते. पंजाबमध्ये दहशतवादाचा मुकाबला केल्यानंतर त्यांना सुपरकॉप म्हटले गेले. जगभरातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये त्यांच्या योगदानाची चर्चा झाली. 1987 मध्ये त्यांनी देशासाठी केलेल्या सेवेबद्दल त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ते काही काळ गुजरातचे डीजीपी देखील होते, परंतु पाकिस्तानमधील हिंदू आणि ख्रिश्चन धर्माच्या लोकांच्या परिस्थितीची भारताशी तुलना केल्याने ते वादात सापडले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : Priyanka Gandhi: मनी लाँड्रिंग प्रकरणात प्रियंका गांधींचे नाव; ईडीने आरोपपत्रात केले ‘हे’ आरोप

या विधानामुळे होतोय सध्या वाद

ज्युलिओ रिबेरो यांनी 25 डिसेंबर रोजी एका कार्यक्रमात म्हटले होते की, पाकिस्तानमधील हिंदू आणि ख्रिश्चन खरेतर द्वितीय श्रेणीचे नागरिक म्हणून भीतीने जगत आहेत, जे येथे भारतात होऊ शकते. तरी मला त्याच गोष्टीची भीती वाटते. पंतप्रधान मोदींनी ख्रिसमसच्या निमित्ताने ख्रिश्चन समुदायाच्या सदस्यांना दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी आमंत्रित केले होते तेव्हा त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. रिबेरो यांनी दावा केला की, पंतप्रधान केरळमधील एका ख्रिश्चन व्यक्तीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत असाही आरोप त्यांनी यावेळी केला.

- Advertisement -

हेही वाचा : Accident : सहा भारतीयांचा अमेरिकेत मृत्यू; सुट्टी घालविण्यासाठी गेलेल्यांवर काळाचा घाला

भाजपकडून रिबेरो यांच्यावर पलटवार

ज्युलिओ रिबेरो यांच्या या विधानानंतर भाजपकडूनही त्यांच्यावर टीका केली जात आहे. गोवा भाजपाचे प्रवक्ते गिरिराज पै वर्नेकर यांनी टीका करताना म्हटले आहे की, रिबेरोंचं भारत व पाकिस्तानची तुलना करणारं विधान हे फक्त अस्वीकारार्हच नाही, तर आपल्या महान देशानं आत्तापर्यंत मिळवलेल्या अनेक यशांचा आणि मूल्यांचा अवमान करणारं आहे. ‘पाकिस्तानचं भगवेकरण’ असे शब्द वापरून ते त्यांच्या विचारसरणीविरोधातील सरकार सत्तेत आल्याचा रागच व्यक्त करत असल्याची टीका वर्नेकर यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -