घरदेश-विदेशमध्य प्रदेशमध्ये काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, कमलनाथांच्या विधानाने खळबळ

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, कमलनाथांच्या विधानाने खळबळ

Subscribe

काँग्रेसकडून मध्य प्रदेशमधील उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पण यामुळे काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. मध्य प्रदेशचे काँग्रेस अध्यक्ष कमलनाथ यांनी तिकीट वाटपावरून केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे.

मध्य प्रदेश : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची तारिख निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली आहे. 17 नोव्हेंबरला मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून भाजप, काँग्रेस तसेच अन्य पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. काँग्रेसकडून देखील मध्य प्रदेशमधील उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पण यामुळे काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. मध्य प्रदेशचे काँग्रेस अध्यक्ष कमलनाथ यांनी तिकीट वाटपावरून केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. (Kamal Nath’s Sensational Statement on Internal Conflict in Congress Party in Madhya Pradesh)

काही महिन्यांपूर्वी भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले कोलारसचे आमदार वीरेंद्र रघुवंशी यांचे तिकीट शेवटच्या क्षणी रद्द केल्याने काँग्रेस पक्षात नव्या वादाला सुरुवात झाली आहे. वीरेंद्र रघुवंशी यांचे तिकीट रद्द झाल्याने यामुळे रघुवंशी यांच्या संतापलेल्या कार्यकर्त्यांनी मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांची भेट घेऊन पक्षाच्या निर्णयाला विरोध दर्शवला. यावेळी कमलनाथ यांनी काँग्रेस नेते रघुवंशी यांच्या समर्थकांना सडेतोड उत्तर दिले. या घटनेचा व्हिडीओ भाजपच्या सोशल मीडिया टीमकडून शेअर करण्यात आला आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण ?

वीरेंद्र रघुवंशी यांचे तिकीट रद्द झाल्याने यामुळे रघुवंशी यांच्या संतापलेल्या कार्यकर्त्यांनी मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांची भेट घेऊन पक्षाच्या निर्णयाला विरोध दर्शवला. याबाबतचा जो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे, त्यात असे दिसून येते की, कमलनाथ रघुवंशी यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. कार्यकर्त्यांशी बोलताना ते म्हणतात की, तिकीट वाटप करताना काही तरी गोंधळ झाली आहे. तुम्ही वीरेंद्रबद्दल बोलू नका, त्याला काँग्रेसमध्ये मी आणले आहे. मी दिग्विजय सिंह यांना उद्या संध्याकाळी दिल्लीला बोलावले आहे. केपी सिंह यांनी शिवपुरीला का जावे? मला हे समजले नाही. मला स्वतःला वीरेंद्र समोर जाताना लाज वाटली. मला रघुवंशी समाजाला उत्तर द्यायचे आहे. मी स्वतः याचा शोध घेत आहे. दिग्विजय सिंह आणि जयवर्धन यांच्याशी शिवपुरीबद्दल चर्चा करणार आहे. मी वीरेंद्रवर तुमच्यापेक्षा जास्त प्रेम करतो. तुम्ही मला काय समजावायला आलात? आता जा आणि दिग्विजय सिंह आणि जयवर्धन यांचे कपडे फाडा, म्हणजेच आता जा आणि दिग्विजय सिंह आणि त्यांचे आमदार पुत्र जयवर्धन सिंह याबाबत बोला असे कमलनाथ या व्हिडीओमध्ये कार्यकर्त्यांशी बोलताना दिसत आहेत.

परंतु, या व्हिडीओवरून भाजपने काँग्रेसवर आणि विशेषतः कमलनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. मध्य प्रदेशचे भाजपचे मीडिया प्रभारी आशिष अग्रवाल यांनी हा व्हिडीओ पोस्ट करत लिहिले आहे की, दिग्विजय सिंह आणि जयवर्धनचे कपडे फाडून टाका…” अहो कमलनाथ जी, तुम्ही तर थेट कपडे फाडण्याची भाषा करत आहात. बरोबर, अख्खी काँग्रेस फाटली असताना तुम्ही काय करू शकता?. तसे, दिग्विजय सिंह जी, शिवपुरीहून आलेल्या वीरेंद्र रघुवंशी यांच्या समर्थकांमध्ये कमलनाथजींसोबत झालेल्या संभाषणाचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर दिग्विजय सिंह तुम्हाला आणि तुमच्या मुलाला नक्कीच वेदना होतील आणि तुम्ही याचा बदलाही घ्याल. आता कोण कोणाचे कपडे फाडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.

- Advertisement -

मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील कोलारस विधानसभेतील भाजप आमदार वीरेंद्र रघुवंशी यांनी गेल्या महिन्यातच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. कोलारसऐवजी शिवपुरी मतदारसंघातून काँग्रेस रघुवंशी यांना उमेदवारी देऊ शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. पण नवरात्रीच्या आदल्या दिवशी जाहीर झालेल्या पहिल्या यादीत काँग्रेसने शिवपुरीमधून मागील आमदार केपी सिंह यांना तिकीट दिले. कोलारस मतदारसंघातून बैजनाथ यादव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले वीरेंद्र रघुवंशी चिंतेत सापडले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -