घरदेश-विदेशED ला उत्तर पाठवून केजरीवाल MP दौऱ्यावर; चौकशीला राहणार नाही हजर

ED ला उत्तर पाठवून केजरीवाल MP दौऱ्यावर; चौकशीला राहणार नाही हजर

Subscribe

मध्य प्रदेश दौऱ्यावर जाण्याआधी ईडीला पाठवलेल्या उत्तरात केजरीवाल यांनी ईडीची समन्स नोटीस बेकायदेशीर आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल गुरुवारी (2 नोव्हेंबर) कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर राहणार नाहीत. केजरीवाल यांनी गुरुवारी सकाळी ईडीला मेलद्वारे उत्तर पाठवले असून मध्य प्रदेशातील त्यांचा आजचा राजकीय कार्यक्रम आधीच निश्चित झाल्याची माहिती दिली आहे. निवडणुकीच्या व्यस्ततेमुळे ते आज ईडीच्या कार्यालयात येऊ शकणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. (Kejriwal MP on tour by sending reply to ED Will not be present for interrogation)

मध्य प्रदेश दौऱ्यावर जाण्याआधी ईडीला पाठवलेल्या उत्तरात केजरीवाल यांनी ईडीची समन्स नोटीस बेकायदेशीर आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे. भाजपच्या सांगण्यावरून ही नोटीस पाठवण्यात आली आहे. निवडणूक प्रचारासाठी मला चार राज्यांत जाता येणार नाही, यासाठी ही नोटीस पाठवण्यात आली होती. ईडीने ही नोटीस तत्काळ मागे घ्यावी. केजरीवाल ईडीच्या कार्यालयात कधी जाणार की यावर अजून सस्पेन्स आहे.
मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार (मनी लाँड्रिंग) प्रकरणात ईडीने केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावले आहे. मद्य धोरण घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी ईडीने केजरीवाल यांना समन्स बजावल्याने आप नेते संतापले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : सगळ्या विरोधकांना तुरुंगात डांबा अन् मगच निवडणुका घ्या; ठाकरे गटाचा उपरोधिक सल्ला

मंत्री आतिशी मार्लेना यांनी व्यक्त केली भीती

दिल्लीच्या मंत्री आतिशी मार्लेना यांनी मंगळवारी भाजप आप नेत्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. आतिशी मार्लेना म्हणाल्या की, सर्व बाजूंनी माहिती मिळत आहे आणि वृत्त येत आहेत की, अरविंद केजरीवाल 2 नोव्हेंबरला ईडीसमोर हजर होतील तेव्हा ईडी त्यांना अटक करेल आणि तुरुंगात टाकेल. यापूर्वी, सुमारे सहा महिन्यांपूर्वी एप्रिलमध्ये सीबीआयने या प्रकरणी केजरीवाल यांची सुमारे नऊ तास चौकशी केली होती. सीबीआयने केजरीवाल यांना सुमारे 56 प्रश्न विचारले. चौकशी केल्यानंतर केजरीवाल यांनी हे संपूर्ण प्रकरण निराधार, बनावट आणि ‘आप’ला नष्ट करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले होते.

- Advertisement -

हेही वाचा : पश्चिम महाराष्ट्रातही सापडताहेत कुणबी दाखले; अनेक राजकारण्यांनी याआधीच गुपचूप काढला दाखला

आता तेच भ्रष्टचाराचे समर्थन करतायेत

आपवर निशाणा साधत भाजप नेते शेहजाद पूनावाला म्हणाले, न्यायालये आता तुमच्यावर सूडबुद्धीची कारवाई करत आहेत का? दारू घोटाळा झाला आहे, 338 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे, आता सुप्रीम कोर्ट सूडबुद्धीने वागते आहे का? मनीष सिसोदिया आणि संजय सिंग यांना अनेक महिने जामीन नाकारताना न्यायालये तुमच्याविरुद्ध आहेत का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. पुढे म्हणाले, ज्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध यात्रा काढली होती आता तेच भ्रष्टाचाराला न्याय देण्यासाठी आले आहेत असे म्हणत त्यांनी आपवर निशाणा साधला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -