घरदेश-विदेशकेरळमध्ये पावसाचे २९ बळी

केरळमध्ये पावसाचे २९ बळी

Subscribe

केरळमध्ये मुसळधार पावसाचे आतापर्यंत २९ जणांचा बळी गेला आहे. पुढच्या ७२ तासामध्ये केरळच्या ११ जिल्ह्यामध्ये हाय अलर्ट देण्यात आला आहे. या पावासामुळे आतापर्यंत ५४ हजारापेक्षा अधिक नागरिक बेघर झाले आहेत.

केरळमध्ये गेल्या तीन दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहेत. पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत २९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी शनिवारी पूराने प्रभावित झालेल्या जिल्ह्यांचा दौरा केला. जवळपास अर्धे केरळ पूरामुळे प्रभावित झाले आहे. पुढच्या ७२ तासामध्ये केरळमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे.

- Advertisement -

४० वर्षानंतर आला मोठा पूर

मुसळधार पावसामुळे नदी, नाले, बंधारे आणि धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. इडुक्की धरणामध्ये पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे २६ वर्षानंतर या धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. या धरणाचे ५ दरवाजे खोलण्यात आले आहेत. ४० वर्षानंतर ऐवढा मोठा पूर आला आहे. पावसामुळे आलेल्या पूरामुळे अनेक गावं पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे ५४ हजारापेक्षा अधिक नागरिक बेघर झाले आहेत. या नागरिकांसाठा ४३९ रिलीफ कॅम्प तयार करण्यात आले आहे. तर पूरात अडकलेल्यांना सुरक्षित ठिकाणी हालवण्यात आले आहे.

- Advertisement -

एनडीआरएफ,आर्मी आणि नेव्हीकडून बचावकार्य सुरु

एनडीआरएफची टीम, आर्मीचे जवान, कोस्ट गार्डच्या टीमकडून मदत कार्य सुरु आहे. एनडीआरएफच्या तीन टीम बचावकार्यात लागल्या आहेत. तर आर्मीच्या जवानांच्या ८ टीमकडून बचावकार्य सुरु केले आहे. केरळच्या तिरुअनंतपूरम, कोलम आणि इडुक्कीमध्ये सर्वात जास्त पाऊस पडला आहे. अयानकुलु, इडुक्की आणि वायनाडमध्ये आर्मीचे ४०० जवान मदतकार्य करत आहेत. नेवीच्या ४ टीम आणि एक सी किंग हेलिकॉप्टर वायनाडमध्ये पूरात अडकलेल्या लोकांना वाचवण्याचे प्रयत्न करत आहे.

११ जिल्ह्यामध्ये हाय अलर्ट

केरळ राज्यात पावसाने थैमान घातले आहे. राज्याच्या १४ जिल्ह्यापैकी ११ जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पर्यटकांना केरळपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पवासामुळे इडुक्कीमध्ये भूस्खलन होऊन १० नागरिकांचा, मलप्पुरममध्ये ५, कन्नूरमध्ये २ आणि वायनाड जिल्ह्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. वायनाड, पलक्कड आणि कोझिको़ जिल्ह्यामध्ये दोन व्यक्ती बेपत्ता झाले आहेत. इडुक्कीच्या अडीमाली शहरामध्ये एकाच कुटुंबातिल ५ लोकांचा मृत्यू झाला आहे.

मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पावसामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना तसेच ज्याची घरं पुरामध्ये वाहून गेली आहेत त्यांना मदतीची घोषणा केली आहे. केरळमध्ये पवासामुळे आतापर्यंत २९ जणांचा मृत्यू झाला. या मृतकांच्या कुटुंबियांना ४ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर पूरामध्ये ज्यांची घरं वाहून गेली त्यांना १० लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे.

रेल्वे ट्रॅक पाण्याखाली

मुसळधार पावसामुळे आलेल्या पूरात रेल्वे ट्रॅकचे मोठे नुकसान झाले आहे. कांजीकोड आणि वालायरच्या मध्ये रेल्वे ट्रॅकचे मोठे नुकसान झाले आहे. या मार्गावर रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. डीआरएम आणि अन्य अधिकाऱ्यांनी या भागाची पहाणी केली. सध्या ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे.

कोच्ची एअरपोर्ट बुडाण्याची शक्यता

पेरियार नदीच्या पाणी पातीत वाढ होत चालली आहे. त्यामुळे कोच्ची एअरपोर्ट बुडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोच्ची एअरपोर्ट नदी जवळ आहेत. त्यामुळे एअरपोर्टवरुन अनेक विमान उड्डान रद्द करण्यात आली. इडुक्की धरणाचे दरवाजे खोलल्याने पेरियार नदीला पूर् आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -