घरताज्या घडामोडीRussia-Ukraine War: युक्रेनच्या या पाच शहरांवर रशिया ताबा करण्याची शक्यता, जाणून घ्या...

Russia-Ukraine War: युक्रेनच्या या पाच शहरांवर रशिया ताबा करण्याची शक्यता, जाणून घ्या कारण?

Subscribe

युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर खारकीवमध्ये रशियाने केलेल्या हल्ल्यात जवळपास आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. याआधी खारकीवच्या मध्यभागी रशियन सैन्याने केलेल्या रॉकेट हल्ल्यामध्ये ३५ लोक ठार झाले आहेत. तर ३५ जणं जखमी झाले आहेत. युक्रेनच्या गृह मंत्रालयाचे सल्लागार अँटोन हेराश्चेन्को यांनी सांगितले की, मातीचा ढिगारा काढल्यानंर मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

रशियाने गेल्या अनेक दिवसांपासून युक्रेनमधील काही प्रमुख शहरांवर हल्ले तीव्र केले आहेत. रशियाला कोणती पाच शहरे ताब्यात घ्यायची आहेत? ते जाणून घेऊयात.

- Advertisement -

कीव

कीव हे शहर युक्रेनची राजधानी आहे. कीव हे एक अतिशय प्राचीन शहर आहे, ज्यामध्ये रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांचा समावेश आहे. कीव हे प्राचीन चर्च आणि मठांच्या सुवर्ण घुमटांसाठी ओळखले जाते. १९९१ पासून स्वतंत्र असलेली युक्रेनची राजधानी दशलक्ष लोकसंख्येचे शहर आहे.

खारकीव

खारकीव हे युक्रेनमधील दुसरे मोठे शहर आहे. युक्रेनचे हे शहर रशियन सीमेपासून फक्त ४० किलोमीटर अंतरावर आहे. १.४ दशलक्ष रहिवासी असलेल्या शहरात प्रामुख्याने रशियन भाषा बोलली जाते. अलीकडच्या काळात रशियन सैन्याने यावर जोरदार बॉम्बफेक करण्यास सुरूवात केली आहे.
हे शहर डोनबासच्या जवळ असल्याने रशियाला अलीकडेच मान्यता मिळालेल्या डोनबासचा फायदा घ्यायचा आहे.

- Advertisement -

मारियुपोल

रशियाने युक्रेनवर आक्रमण सुरू केल्यापासून अझोव्ह समुद्रावरील मारियुपोल हे एक मोठे बंदर शहर आहे. २०१४ मध्ये कीव विरुद्ध उठाव सुरू असताना डोनेटस्क येथून रशियन-समर्थित फुटीरतावाद्यांनी मारियुपोलला ताब्यात घेतले होते. २०१४ मध्ये रशियाने क्रिमिया शहराला आपल्या ताब्यात घेतले होते. रशियन लष्कराने मंगळवारी फुटीरतावाद्यांशी संबंध असल्याचा दावा केला आहे. हे शहर क्रिमियाजवळ असल्याने रशियासाठी ते ताब्यात घेणे अत्यंत आवश्यक आहे.

बर्डियांस्क

रशियन सैन्याने सोमवारी क्रिमियामधून पुढे जात अझोव्ह समुद्रावरील बर्डियांस्क बंदर ताब्यात घेतल्याचा दावा केला. ११५,००० रहिवाशांचे रिसॉर्ट समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. मारियुपोलपासून ते किनारपट्टीपासून फक्त ८४ किलोमीटर अंतरावर आहे.

खेरसॉन

क्रिमियामधून खेरसॉनला रशियन सैन्याने घेरले असल्याचे बोलले जात आहे. हे शहर नीपर नदीच्या पश्चिम किनार्‍यावरील एक मोक्याचे बंदर आहे आणि क्रिमियन द्वीपकल्पासाठी अत्यंत मोक्याचे शहर आहे. हे शहर एकेकाळी रशियन ब्लॅक सी फ्लीटचे मूळ शहर होते. यावर रशियाने हल्ला केल्यानंतर पश्चिमेकडील ओडेसाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. त्यासाठी या शहरावर ताबा मिळवणं रशियासाठी महत्त्वाचं आहे.


हेही वाचा : Russia-Ukraine War: युक्रेनमध्ये सैन्य पाठवण्यास ब्रिटनचा नकार, पीएम बोरिस जॉन्सन म्हणाले…


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -