घरताज्या घडामोडीस्थायी समितीच्या बैठकीत कोट्यवधी रुपयांचे १७९ प्रस्ताव मंजुरीसाठी सादर

स्थायी समितीच्या बैठकीत कोट्यवधी रुपयांचे १७९ प्रस्ताव मंजुरीसाठी सादर

Subscribe

मुंबई महापालिकेची मुदत ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे निवडणूक तोंडावर आली आहे. असे असताना अखेरच्या दिवसातील स्थायी समितीची महत्वाची बैठक २ मार्च रोजी दुपारी होणार असून त्यामध्ये कोट्यवधी रुपयांचे १७९ प्रस्ताव मंजुरीसाठी येणार आहेत. त्यामुळे हे सर्व प्रस्ताव बिनविरोध अथवा साधकबाधक चर्चेअंती मंजूर करवून घेणे ही स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांची जबाबदारी असणार आहे. तर सदर १७९ प्रस्तावातील चुका, त्रुटीवर बोट ठेवून त्यातील संशयास्पद बाबीवर चर्चा घडवून आणणे व समाधानकारक उत्तरे मिळेपर्यंत ते प्रस्ताव रोखुन धरण्याची जबाबदारी पालिकेतील पहारेकरी व एकेकाळी शिवसेनेचा मित्र पक्ष असलेल्या भाजपची असणार आहे.

तर राज्यात सत्तेत असलेल्या मात्र पालिकेत विरोधी बाकांवर बसणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची कसोटी लागणार आहे. ते सदर प्रस्तावाबाबत कोणती व नेमकी काय भूमिका घेणार, हे बुधवारी बैठकित समोर येणार आहे. या १७९ प्रस्तावात अधिकतर कोट्यवधी रुपयांचे प्रस्ताव हे कोविड संसर्गावरील रुग्णालये, रुग्ण, औषधोपचार यावरील खर्चाबतचे आहेत. त्यानंतर हँकॉक पूल, मुंबईतील इतर पुलांची दुरुस्ती कामे, रस्ते कामे, पालिका सफाई कामगारांच्या वसाहतींचा आश्रय योजने अंतर्गत पुनर्विकास करणे व त्या कामांसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमणे आदी कामांबाबतचे प्रस्ताव आहेत. तसेच, पावसाळ्यात नालेसफाई कामाचे १३० कोटींचे प्रस्ताव मंजुरीला आले आहेत. पातमुखे, पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पंपिंग यंत्रणा भाड्याने घेणे, पर्जन्य जलवाहिनीची कामे आदींचे प्रस्ताव आहेत. कामगारांच्या भरतीप्रक्रियेबाबतच्या धोरणातील बदलांबाबत काही प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत.

- Advertisement -

कदाचित स्थायी समितीची शेवटची बैठक नाही

महापालिकेची मुदत जरी ७ मार्चपर्यंत असली तरी स्थायी समितीची उद्याची म्हणजे २ मार्च रोजी दुपारी २ वाजता होणारी बैठक ही कदाचित शेवटची बैठक नसणार. कारण की, स्थायी समिती अध्यक्ष हे बैठक केव्हा, कधी व किती वेळा आणि कशी काय घ्यायची त्याबाबतचा निर्णय घेतात. उद्याची बैठक काही कामकाज करून काही कारणास्तव विषय तहकुब ठेवून ते सदर बैठक चालू आठवड्यात अगदी पालिकेची मुदत संपण्याच्या दिवशी ७ मार्च रोजीही घेऊ शकतील. त्यामध्ये इतर महत्वाचे प्रस्ताव ते मंजुरीला घेऊ शकतील.

- Advertisement -

हेही वाचा : Russia-Ukraine War: युक्रेनच्या या पाच शहरांवर रशिया ताबा करण्याची शक्यता, जाणून घ्या कारण?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -