घरताज्या घडामोडीDurga Puja : कोलकात्याच्या दुर्गा पूजेचा UNESCO च्या हेरीटेज यादीत समावेश

Durga Puja : कोलकात्याच्या दुर्गा पूजेचा UNESCO च्या हेरीटेज यादीत समावेश

Subscribe

कोलकात्यातील अतिशय प्रसिद्ध अशा दुर्गा पूजेला बुधवारी मोठा सन्मान मिळाला आहे. संयुक्त राष्ट्राच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था (UNESCO) ने या पुजेला हेरिहेटजा दर्जा दिला आहे. हा सन्मान मिळाल्यामुळे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही हेरिटेज दर्जा मिळाल्याबाबत कौतुक केले आहे. युनेस्कोने एका ट्विटच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली.

काय आहे युनेस्कोचे ट्विट ?

कोलकात्याच्या दुर्जा पुजेचा समावेश आता वारसा यादीमध्ये करण्यात आला आहे. भारताचे अभिनंदन अशा शब्दात युनेस्कोने भारताचे कौतुक केले आहे. त्यासोबतच एक फोटोही ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यामध्ये #livingheritage हॅशटॅग वापरण्यात आला आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करत प्रत्येक भारतीयासाठी ही आनंदाजी आणि कौतुकाची बाब असल्याचे ट्विट केले आहे. दुर्गा पूजा ही आपल्या संस्कृतीचा ठेवा आहे. दुर्गा पूजेच्या अनुभव हा प्रत्येकाने घ्यायला हवा, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांनी दुर्गा पूजा हा एक सण नसून लोकांच्या भावना या गोष्टीशी जोडल्या गेलेल्या असल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे. बंगालसाठी ही अतिशय अभिमानास्पद गोष्ट असल्याचेही त्या म्हणाल्या. लोकांना एकत्र करणारा अशी ही दुर्गा पूजा असून लोकांच्या भावना या पूजेशी जोडल्या गेल्या आहेत. युनेस्कोच्या हेरिटेज यादीमध्ये या पूजेचा समावेश झाला आहे. सर्वांसाठी आनंदाचा क्षण असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानेही या प्रसंगी अभिनंदन केले आहे.

दुर्गा पूजेचा समावेश आता युनेस्कोच्या हेरिटेज यादीत झाल्याने सर्वांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. खूप खूप अभिनंदन. आपल्या देशातील प्रगल्भ असा वारसा आणि संस्कृती यासोबतच कला, परंपरा आणि चालीरीती यांचे मिश्रण असल्याचेही मंत्रायलायने म्हटले आहे.

वारिषिक दुर्गापूजा महोत्सव हा देशातील अनेक भागात विशेषतः कोलकात्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दहा दिवस चालणाऱ्या पुजेसाठी मातीच्या सुंदर अशा मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. गंगा नदीतील मातीपासून या मूर्तीची स्थापना करण्यात येते.

दुर्गापूजेसोबतच आणखी काही गोष्टींचा समावेशही हेरिटेजच्या यादीमध्ये झाला आहे. त्यामध्ये वेनेझुएला येथील संत जॉन उत्सव, पनामा येथील कॉर्पस ख्रिस्ती महोत्सव आणि तरीजा येथील बोलिवियन ग्रॅण्ड फेस्टिव्हलचा समावेशही हेरिटेज यादीत करण्यात आला आहे. त्यासोबतच काही नृत्य प्रकारांनाही यादीमध्ये स्थान मिळाले आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -