घरताज्या घडामोडीVijay Diwas 2021: भारत पाक युद्धातील एअरड्रॉप मिशन काय होते?

Vijay Diwas 2021: भारत पाक युद्धातील एअरड्रॉप मिशन काय होते?

Subscribe

संपूर्ण देशभरात १६ डिसेंबर हा विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. १९७१ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध झालं होतं. १६ डिसेंबर १९७१ मध्ये भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. त्यामुळे नव्या बांगलादेशाची निर्मिती झाली. भारत आणि पाकिस्तान यांच्या फाळणीनंतर बांगलादेशच्या निर्मितीची तयारी झाली. भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यामुळे एक ऐतिहासिक विजय म्हणून हा दिवस साजरा केला जातो. मात्र, यामध्ये सर्वात महत्वाचं मिशन ठरलं ते म्हणजे एअरड्रॉप मिशन. या मिशनमध्ये भारतीय सैनिक हवेतून अवरतले होते.

काय आहे एअरड्रॉप मिशन ?

भारत आणि पाकिस्तान या युद्धामध्ये हवाई दलाने खास एअरड्रॉप मोहीम राबवली होती. या मोहिमेत ढाक्यातून पाकिस्तानी सैन्याने माघार घेण्यास सुरुवात देखील केली होती. तेव्हा त्यांची कोंडी करण्याची जबाबदारी ही संपूर्णपणे लेफ्टनंट कर्नल कुलदीपसिंग पन्नू यांच्या बटालियनवर सोपावण्यात आली होती. हवाल दलाच्या माध्यमातून छत्रीधारी सैन्य या ठिकाणी उतरवले. त्यानंतर पॅराटूपर्सनी त्यांच्यावर हल्ला चढवत त्यांनी पूल उद्धवस्त केला होता. त्यामुळे ही चढाई या लढाईमध्ये वैशिष्टपूर्ण ठरली होती.

- Advertisement -

पाकिस्तानी सैन्य आल्याननंतर त्यांच्यावर हल्ला करण्यात यावा, यासाठी ही योजन लष्कराने आखली होती. बांगलादेशातील तंगेल या शहरानजीकच्या एका पुलानजीक पाकिस्तान सैन्य आल्यानंतर त्यांच्यावर हल्ला करण्यात यावा, यासाठी ही मोहीम राबवण्यात आली होती.

१६ डिसेंबरच्या पहाटे नक्की काय झालं ?

भारतीय सैन्याने युद्धादरम्यान ढाक्याला चारही बाजूंनी वेढले होते. आत्मसमर्पणाच्या तयारीसाठी तात्काळ ढाका येथे पोहोचण्यासाठी भारताचे जनरल जेकब यांना मानेकशॉ यांचा संदेश मिळाला. भारताजवळ त्यावेळी फक्त तीन हजार सैनिक होते. तसेच ते ढाकापासून ३० किलोमीटर लांब होते. दुसरीकडे पाकिस्तानी सेनेचे कमांडर लेफ्टिनंट जनरल एएके नियाजी यांच्या जवळ ढाकामध्ये २६ हजार ४०० सैनिक होते. भारतीय सैनिकांनी पूर्णपणे युद्धावर आपली पकड मजबूत केली होती.

- Advertisement -

भारताच्या ३ हजार सैनिकांनी पाकिस्तानच्या ९३ हजार सैन्याभोवती घेराव घातला होता. सैन्य मृत्यूत्या तावडीत सापडल्यामुळे भारतासमोर आत्मसमर्पण करण्याशिवाय नियाजींकडे कोणताच पर्याय नव्हता. जेकब ढाक्याला पोहोचले तेव्हा युद्ध सुरुच होते. नियाजी यांची भेट झाल्यानंतर जेकब यांनी आत्मसमर्पणाचा खलिता वाचून दाखवला. आम्ही आत्मसमर्पण करत आहोत, असे म्हणत जनरल नियाजी संतप्त झाले होते.

आत्मसमर्पण करा नाहीतर परिणामांना समोरे जाण्याची तयारी ठेवा असे म्हटल्यावरही नियाजी आत्मसमर्पण करण्यास तया नव्हते. परंतु दोन्ही जनरलमध्ये चर्चा झाल्यानंतर पाकिस्तानच्या जनरल नियाजी यांना अर्धा तास विचार करण्यासाठी वेळ देण्यात आला. यानंतर जेकब यांनी नियाजींना ३ वेळा आत्मसमर्पणाविषयी विचारले परंतु कोणतेही उत्तर मिळाले नाही. मात्र, भारताचे मेजर जनरल जगजीत सिंह अरोरासुद्धा पोहोचले होते. त्यामुळे त्यांना आत्मसमर्पण करण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. त्यामुळे नियाजी यांनी ९३ हजार सैनिकांसोबत भारतासमोर आत्मसमर्पण केलं होतं. त्यामुळे बांगलादेशला स्वातंत्र्य मिळालं. याच दिवसाची आठवण आणि ऐतिहासिक दिवस म्हणून १६ डिसेंबर रोजी विजय दिवस साजरा केला जातो.


हेही वाचा : Drone Vaccination : ड्रोनद्वारे लसीकरण मोहिम, पालघरमध्ये राज्यातील पहिलाच


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -