घरदेश-विदेशलालूप्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक, आज एम्स दिल्लीला एअर अॅम्ब्युलन्सने जाणार

लालूप्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक, आज एम्स दिल्लीला एअर अॅम्ब्युलन्सने जाणार

Subscribe

RIMS चे संचालक कामेश्वर प्रसाद यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, वैद्यकीय मंडळाने RJD नेते लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीचा आढावा घेतल्यानंतर त्यांना त्यांच्या हृदय आणि मूत्रपिंडात समस्या असल्याचे आढळून आले. त्यांना चांगल्या उपचारासाठी दिल्लीच्या एम्समध्ये पाठवण्यात येत आहे. कारागृह अधिकारी तारीख निश्चित करतील.

नवी दिल्लीः चारा घोटाळ्यातील दोषी आणि आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांची प्रकृती अचानक खालावली आहे. तसेच चारा घोटाळ्यात दोषी असलेले बिहारचे माजी मंत्री आर. के. राणा यांचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळालीय. रिम्स व्यवस्थापनाच्या निर्णयानंतर लालू प्रसाद यादव आणि आर. के. राणा यांना आज दिल्लीतील एम्समध्ये पाठवले जाऊ शकते. लालू प्रसाद यादव यांना किडनीचा त्रास असल्याचे सांगितले जात आहे. या संदर्भात आज 12 वाजण्यापूर्वी वैद्यकीय मंडळाची बैठक झाली. आताच मिळालेल्या माहितीनुसार, लालू यादव ग्रीन कॉरिडॉरने दिल्लीला जाणार आहेत. तुरुंग प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, लालूंच्या सुटण्याची वेळ अद्याप ठरलेली नाही. मात्र, सायंकाळपर्यंत पाठवण्याची तयारी सुरू आहे.

RIMS संचालकांचे काय म्हणणे…

RIMS चे संचालक कामेश्वर प्रसाद यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, वैद्यकीय मंडळाने RJD नेते लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीचा आढावा घेतल्यानंतर त्यांना त्यांच्या हृदय आणि मूत्रपिंडात समस्या असल्याचे आढळून आले. त्यांना चांगल्या उपचारासाठी दिल्लीच्या एम्समध्ये पाठवण्यात येत आहे. कारागृह अधिकारी तारीख निश्चित करतील.

- Advertisement -

लालू प्रसाद यादव यांची किडनी सातत्याने खराब

रांची RIMS च्या डॉक्टरांनी सांगितले की, RJD सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांची किडनी सतत खराब होत आहे. पेइंग वॉर्डमध्ये दाखल असलेल्या राजद अध्यक्षांच्या किडनी फेल झाली आहे. अशा स्थितीत लालूंच्या प्रकृतीवर वाईट परिणाम होत आहे. प्रकृतीत सुधारणा न झाल्यास डायलिसिस करण्यात येईल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

फुफ्फुसात सतत पाणी भरत राहिल्याने संपूर्ण शरीरात संसर्ग

आर. के. राणा यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांच्या फुफ्फुसात सतत पाणी भरतेय, त्यामुळे संसर्ग संपूर्ण शरीरात पसरत आहे. सध्या प्रकृती उत्तम राहण्यासाठी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नवीन ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. जिथे त्यांच्यावर व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, आर. के. राणा यांना लिव्हर इन्फेक्शन आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

15 मार्चला उपचारासाठी रिम्समध्ये आणण्यात आले

आर. के. राणा यांना 15 मार्चला बिरसा मुंडा मध्यवर्ती कारागृह होतवार येथून रिम्समध्ये उपचारासाठी आणण्यात आले होते. 21 फेब्रुवारीला लालू प्रसाद यादव यांच्यासह सीबीआय कोर्टाने आर. के. राणा यांनाही 5 वर्षांची शिक्षा आणि 60 लाखांचा दंड ठोठावला होता.


हेही वाचाः नारायण राणेंना मोठा दिलासा, निकाल विरोधात गेल्यास 3 आठवडे कारवाई न करण्याचे कोर्टाचे निर्देश

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -