घरदेश-विदेशविमानात सामान लोड करताना लागला डोळा अन् थेट पोहचला दुबईत

विमानात सामान लोड करताना लागला डोळा अन् थेट पोहचला दुबईत

Subscribe

कधी प्रयत्न करुनही कुणाला विमानाने प्रवास करण्याची संधी मिळत नाही, तर कुणाला नकळत याचा आनंद घेता येतो. असाच काहीसा प्रकार मुंबईत सामान लोड करणाऱ्या लोडरसोबत घडला आहे. विमानात सामान लोड करता-करता त्याला अचानक झोप लागली मात्र जाग आली तेव्हा तो थेट दुबईत पोहचला होता. विमान संयुक्त अरब अमिरातीमध्ये उतरले तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला.

इंडिगो एअर लाइन्सच्या मुंबई- अबू धाबी प्लाइटच्या कार्गो कंपार्टमेंटमध्ये एक लोडर सामान चढवता चढवता झोपला, मात्र विमान जेव्हा दुबईत लाँड झाले तेव्हा तो सामान ठेवतात त्या ठिकाणी सुरक्षित आढळला. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, रविवारी रात्री सामान लोड केल्यानंतर खाजगी विमान कंपनीचा एक लोडर मालवाहू डब्यात सामानाच्या मागे झोपला. मात्र विमानाने मुंबई विमानतळावरून उड्डाण केले तेव्हा त्याला जाग आली. त्यानंतर थेट दुबईमध्ये उतरवत अबू धाबीच्या अधिकाऱ्यांनी लोडरची वैद्यकीय तपासणी केली. मात्र त्याची मानसिक स्थिती स्थिर असल्याचे आढळून आले.

- Advertisement -

डीजीएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अबू धाबीमधील अधिकाऱ्यांकडून आवश्यक मंजूरी मिळाल्यानंतर त्याला विमानाने प्रवासी म्हणून मुंबईत पावण्यात आले. या घटनेत सहभागी एअरलाईन्स कर्मचाऱ्यांची चौकशी अद्याप बाकी असून लोडरला ड्युटीवरून काढून टाकण्यात आले आहे. इंडिगोच्या प्रवक्त्याने सांगितले की, या घटनेची आम्हाला माहिती असून संबंधित प्रकरणाचा तपास सुरु आहे.


mumbai school reopen : मुंबईतील इयत्ता १ ते ७ वीच्या २ हजारांपैकी १९०२ शाळा सुरु


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -