घरताज्या घडामोडीLok Sabha 2024 : मतांसाठी गुगलवर पक्षांची जाहिरातबाजी; खर्चाची रक्कम 100 कोटींहून...

Lok Sabha 2024 : मतांसाठी गुगलवर पक्षांची जाहिरातबाजी; खर्चाची रक्कम 100 कोटींहून अधिक

Subscribe

लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी पक्षश्रेष्टींनी जाहिरातबाजी सुरू केली आहे. विशेषत: सोशल मीडियावर सर्वांनी लक्ष केंद्रीत केले असून गुगलच्यमा माध्यमातून जाहिरातबाजी केली जात आहे. तसेच, या जाहिरातींचा खर्च 100 कोटींच्या पुढे गेला आहे.

लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी पक्षश्रेष्टींनी जाहिरातबाजी सुरू केली आहे. विशेषत: सोशल मीडियावर सर्वांनी लक्ष केंद्रीत केले असून गुगलच्यमा माध्यमातून जाहिरातबाजी केली जात आहे. तसेच, या जाहिरातींचा खर्च 100 कोटींच्या पुढे गेला आहे. एकिकडे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी निधी नाही असे कारण दिले जात असताना जाहिरातींवर 100 कोटींहून अधिक खर्च कसा होतो? असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. (Lok Sabha 2024 bjp spent rs 31 cr ans congress spent rs 18 lakh on google advertisements)

मिळलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी गुगलच्या माध्यमातून होणाऱ्या जाहिरातींचा खर्च विविध राजकीय पक्षांनी वाढवला आहे. गेल्या तीन महिन्यांत जवळपास 100 कोटींच्या वर हा खर्च पोहोचला आहे. विशेष म्हणजे ही रक्कम गेल्या वर्षीच्या 11 कोटी रुपयांपेक्षा 9 पटीने जास्त आहे. ज्या जाहिराती गुगलच्या माध्यमातून दाखवल्या जात आहेत, त्यामध्ये राजकीय पक्षांच्या चिन्हांचा वापर केला गेला आहे.

- Advertisement -

कोणत्या राज्यातून सर्वाधिक जाहिराती?

गुगलला उत्तर प्रदेशातून सर्वाधिक राजकीय जाहिराती देण्यात आल्या. त्यानंतर ओडिशा, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि गुजरातचा क्रमांक लागतो. एकूण जाहिरात खर्चापैकी 40 टक्के खर्च पाच राज्यांमधून झाला आहे.

भाजपच्या सर्वाधिक जाहिराती

गुगलच्या आकडेवारीनुसार, जानेवारीपासून भाजपने सर्वाधिक जाहिराती दिल्या आहेत. आकडेवारीनुसार, पक्षाने गुगल जाहिरातींवर 30.9 कोटी रुपये खर्च केले आहेत. तसेच, काँग्रेसने केवळ 18.8 लाख रुपये खर्च केले आहेत. एकूण रकमेपैकी 86.4 टक्के रक्कम व्हिडिओ जाहिरातींवर खर्च करण्यात आली आहे. उर्वरित 13.6 टक्के फोटो फॉरमॅटमधील जाहिरातींवर खर्च करण्यात आला आहे.

- Advertisement -

निवडणूक आयोगाने शनिवार (16 मार्च) निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या असून त्यानुसार 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत लोकसभा निवडणुका सात टप्प्यांत होणार आहेत. केंद्रात नवीन सरकार स्थापन करण्यासाठी या निवडणुकांमध्ये सुमारे 97 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील. गेल्यावेळेप्रमाणे यंदाही सात टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिलला मतदान होणार आहे, तर सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी 1 जूनला मतदान होणार आहे. निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागणार आहे. यावेळी सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) विजयाची हॅट्ट्रिक करण्याचा प्रयत्न करत आहे, तर विरोधी पक्षांनी भाजपला रोखण्यासाठी एकजूट दाखवली आहे.


हेही वाचा – SHIV SENA : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात जुन्या शिवसैनिकाला उमेदवारी? उद्धव ठाकरेंची भाजपविरोधात खेळी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -