घरमहाराष्ट्रपुणेVasant More : ...तेव्हा पुणे लोकसभा निवडणुकीत रंगत येईल, वसंत मोरेंनी व्यक्त...

Vasant More : …तेव्हा पुणे लोकसभा निवडणुकीत रंगत येईल, वसंत मोरेंनी व्यक्त केला विश्वास

Subscribe

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला जय महाराष्ट्र केल्यानंतर पुण्यातील वसंत मोरे यांनी अद्यापही कोणत्याही पक्षात अधिकृतरित्या पक्ष प्रवेश केलेला नाही. परंतु, गेल्या काही दिवसांत त्यांनी महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची भेट घेतल्याने विविध चर्चांना उधाण आले होते. परंतु, आता वसंत मोरेंनी केलेल्या एका वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर ते पुण्यातून महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. (Vasant More expressed confidence in contesting the Pune Lok Sabha elections)

हेही वाचा… Lok Sabha 2024 : मराठी स्वाभिमान तुमच्या शब्दकोशात नाहीच… एनसीपी-एसपीच्या निशाण्यावर भाजपा

- Advertisement -

वसंत मोरे हे नेमके कधी आणि कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, त्यांच्याकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची ठाम भूमिका घेण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, पुढील राजकीय वाटचालीसंदर्भात आम्ही लोकांकडून मत जाणून घेतोय. लोक बऱ्याचदा काही पर्याय सुचवतात. पण ते निवडताना पुण्याचे हित झाले पाहिजे त्या दृष्टीने पावले टाकतोय. मी मविआकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. कारण इथे फक्त निवडणुका लढायच्या नाहीयेत तर जिंकायच्याही आहेत. त्यामुळे जिंकण्यासाठी लढायचे असेल तर योग्य ट्रॅकवर असणे गरजेचे आहे. मी योग्य ट्रॅकवरच असून त्यात यशस्वी होईन असे मला वाटते.

तसेच, आजपासून निवडणुकीला 55 दिवस आहेत. त्यामुळे कमी दिवस वगैरे काही नाही. ज्या दिवशी वसंत मोरे रिंगणात उतरेल, त्या दिवशी पुणे लोकसभेच्या निवडणुकीत खऱ्या अर्थाने रंगत येईल. तेव्हा आपण निवडणूक कशी एकतर्फी होईल हे पाहू. दुसऱ्या पक्षात जाण्याआधीच पक्ष सोडल्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, माझी वेळ नक्कीच चुकलेली नाही. मी वेळ घेतोय. योग्य वेळी मी योग्य निर्णय घेईन, असेही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता मविआतील कोणत्या पक्षाकडून वसंत मोरे यांना पुणे लोकसभेची उमेदवारी देण्यात येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -