घरदेश-विदेशPolitics : राजकारणात 10 क्रिकेटर्सची एन्ट्री; काही संसदेपर्यंत पोहचले तर काहींची सुरुवातच...

Politics : राजकारणात 10 क्रिकेटर्सची एन्ट्री; काही संसदेपर्यंत पोहचले तर काहींची सुरुवातच खराब झाली

Subscribe

राजकारण आणि क्रिकेटपटू यांचे नाते खूप जुने आहे. क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर अनेक दिग्गज क्रिकेटपटू राजकीय क्षेत्रात प्रवेश करतात. मात्र राजकारणात अनेकांना यश मिळतेच असे नाही. सध्या लोकसभा निवडणुकीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे आपण अशा क्रिकेटपटूंबद्दल जाणून घेऊया, जे क्रिकेटच्या खेळपट्टीवर चौकार-षटकार मारले, पण राजकीय खेळपट्टीवर क्लीन बोल्डही झाले आहेत.

नवी दिल्ली : राजकारण आणि क्रिकेटपटू यांचे नाते खूप जुने आहे. क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर अनेक दिग्गज क्रिकेटपटू राजकीय क्षेत्रात प्रवेश करतात. मात्र राजकारणात अनेकांना यश मिळतेच असे नाही. सध्या लोकसभा निवडणुकीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे आपण अशा क्रिकेटपटूंबद्दल जाणून घेऊया, जे क्रिकेटच्या खेळपट्टीवर चौकार-षटकार मारले, पण राजकीय खेळपट्टीवर क्लीन बोल्डही झाले आहेत. (Lok Sabha Election 2024 10 Cricketers Entry in Politics Some reached the parliament while some got off to a bad start)

संसदेपर्यंत पोहचलेले क्रिकेटपटू

  1. नवज्योत सिंग सिद्धू
    माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानतंर भाजपामध्ये प्रवेश केला आणि आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 2004 आणि 2009 मध्ये दोन वेळा अमृतसरमधून त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली. मात्र, त्यानंतर सिद्धू यांनी भाजपा सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आमदार नवज्योतसिंग सिद्धू हे पंजाब सरकारमध्ये मंत्रीही राहिले आहेत. मात्र 2022 च्या विधानसभा निवडणुकीत सिद्धू यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
  2. कीर्ती आझाद
    माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद हे बिहारचे माजी मुख्यमंत्री भागवत झा आझाद यांचे पुत्र आहेत. ते दिल्लीच्या गोल मार्केटमधून आमदारही राहिले आहेत. तर भाजपाचे खासदारही राहिले आहेत. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, मात्र फार काळ ते काँग्रेसमध्ये राहिले नाहीत. सध्या ते ममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल काँग्रेस (TMC) चे सदस्य आहेत. किर्ती आझाद यांना पक्षाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत दुर्गापूरमधून तिकीट दिले आहे.
  3. चेतन चौहान
    दिवंगत क्रिकेटपटू चेतन चौहान हे आता आपल्यात नाहीत. मात्र क्रिकेटपासून ते राजकीय खेळपट्टीपर्यंत त्यांचा प्रभाव कायम आहे. 1969 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध पदार्पण करणारे चेतन चौहान उत्तर प्रदेशातील अमरोहा लोकसभा मतदारसंघातून दोनदा भाजपाचे खासदार राहिले आहेत. 2017 मध्ये ते नौगाव सादत विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. यानंतर चेतन चौहान यांना योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळात स्थान मिळाले.
  4. मोहम्मद अझरुद्दीन
    माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन 2009 मध्ये काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक जिंकली. त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी टोंक सवाई माधोपूरमधून निवडणूक लढवली, पण त्यांना यश आले नाही. गेल्या वर्षी मोहम्मद अझरुद्दीन हे हैदराबादच्या जुबली हिल्स भागातून विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते.
  5. गौतम गंभीर
    माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने 22 मार्च 2019 रोजी भाजपामध्ये प्रवेश केला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून गौतम गंभीरला उमेदवारी दिली. गौतम गंभीरने आप नेते आतिशी सिंह आणि काँग्रेस नेते अरविंदर सिंग लवली यांचा पराभव केला होता. असे असतानाही त्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी गौतम गंभीरने राजकारणातून निवृत्ती जाहीर केली.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : गेल्या 10 वर्षात एकही दंगल नाही, मुख्यमंत्री शिंदेंचा कोल्हापुरातून दावा

- Advertisement -

हे क्रिकेटपटू राजकारणात आपली छाप पाडू शकले नाहीत

  1. विनोद कांबळी
    मास्टर ब्लास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा बालपणीचा मित्र विनोद कांबळीला आज प्रत्येकजण ओळखतो. अधूनमधून तो चर्चेत असतो. पण क्रिकेटप्रमाणे तो राजकारणातही विशेष काही करू शकले नाहीत. 2009 मध्ये विनोद कांबळी यांनी मुंबईतील विक्रोळी येथून लोकभारती पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवली, मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
  2. मोहम्मद कैफ
    क्षेत्ररक्षणासाठी प्रसिद्ध असलेला माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ राजकारणात विशेष काही करू शकला नाही. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने मोहम्मद कैफला उत्तर प्रदेशच्या फुलपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. मात्र भाजपाच्या राजकारणामुळे मोहम्मद कैफला पराभवाचा सामना करावा लागला. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी त्यांचा पराभव केला.
  3. चेतन शर्मा
    अष्टपैलू क्रिकेटपटू चेतन शर्मा राजकारणात आपली छाप पाडू शकले नाहीत. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षाने (BSP) हरियाणाच्या फरिदाबाद लोकसभा मतदारसंघातून चेतन शर्मा यांना उमेदवारी दिली. मात्र काँग्रेसचे उमेदवार अवतार सिंह भडाना यांच्याकडून चेतन शर्मा यांना पराभवाचा सामना करावा लागला.
  4. योगराज सिंग
    क्रिकेटपटू युवराज सिंगचे वडील आणि माजी क्रिकेटपटू योगराज सिंग यांनी सुद्धा राजकारणात प्रवेश केला. 2009 मध्ये त्यांनी इंडियन नॅशनल लोक दल (INLD) च्या तिकीटावर हरियाणा विधानसभा निवडणूक लढवली. मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. योगराज सिंग यांनी एक कसोटी आणि सहा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. याशिवाय एक प्रसिद्ध पंजाबी अभिनेता म्हणून त्यांची ओळख आहे.
  5. मन्सूर अली खान पतौडी
    माजी क्रिकेटपटू मन्सूर अली खान पतौडी यांनी 1971 मध्ये हरियाणाचे माजी मुख्यमंत्री राव बिरेंद्र सिंह यांच्या विशाल हरियाणा पक्षाच्या तिकीटावर पहिल्यांदा गुडगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर 1991 मध्ये पतौडी यांनी मध्य प्रदेशातील भोपाळमधून लोकसभा निवडणूक लढवली. मात्र काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या पतौडी यांना भाजपा उमेदवार सुशील चंद्र वर्मा यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला.

हेही वाचा – Nair fire : भाजपा आणि मिंधे गॅंगवाले महाराष्ट्राचा एवढा द्वेष का करतात? आदित्य ठाकरेंचा सवाल

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -