घरदेश-विदेशलोकसभा २०१९ : देशभरात पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

लोकसभा २०१९ : देशभरात पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

Subscribe

लोकसभा २०१९ च्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. आज, ११ एप्रिल रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान प्रक्रिाय पार पडणार आहे. तब्बल २० राज्यातील ९१ मतदारसंघात हे मतदान पार होत आहे. तर महाराष्ट्रातील ७ मतदारसंघांचाही त्यात समावेश आहे. पहिल्या टप्प्यात १८ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेश येथे मतदान होणार आहेत. लोकसभा निवडणुकीचे मतदान सात टप्प्यांमध्ये होणार असून याचा निकाल २३ मे २०१९ रोजी लागणार आहे. यामध्ये आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मेघालय, उत्तराखंड, मिझोराम, नागालँड, सिक्किम, मणिपूर, त्रिपुरा, तेलंगणा, लक्षद्वीप, अंदमान-निकोबार, ओडिशा, आसाम, बिहार, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीर, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये मतदान होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून नागरीकांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहन केले आहे.

- Advertisement -

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -