घरदेश-विदेशगुगलनेही केलं भारतीयांना मतदानाचं आवाहन

गुगलनेही केलं भारतीयांना मतदानाचं आवाहन

Subscribe

भारताच्या लोकसभा निवडणुकांची दखल घेत गुगलनेही भारतीयांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी सात वाजल्यापासूनच सुरूवात झाली आहे. देशातील २० राज्यांमध्ये हे मतदान होणार आहे. राज्यामध्ये एकूण ९१ मतदारसंघामध्ये तर महाराष्ट्रात ७ मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडणार आहे. भारताच्या लोकसभा निवडणुकांची दखल घेत गुगलनेही भारतीयांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशातील सर्वात मोठ्या लोकसभा निवडणुकांना आज सुरुवात झाली आहे. त्यामुळेच देशासोबतच संपूर्ण जगाचं लक्ष भारतातील लोकसभा निवडणुकांकडे लागलेलं आहे. गुगलनेही आपल्या खास डुडलच्या माध्यमातून लोकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवादन केलं आहे.

- Advertisement -

गुगुलच खास डुडल

नेहमीच गुगल त्या त्या दिवसाच महत्त्व ओळखून आपलं डुडल तयार करत असतो. यावेळीही भारतातील लोकसभा निवडणूकीचे महत्त्व लक्षात घेऊन मतदार राजाला मतदानाचे आवाहन केलं आहे. गुगलने मतदान केल्यानंतर मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाहीला आपल्या डुडलमध्ये स्थान दिलं आहे. यासोबतच गुगलकडून लोकांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं. त्याचप्रमाणे तुम्ही कशाप्रकारे मतदान करु शकता याबाबतची संपूर्ण प्रक्रियाही सांगण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -