घरदेश-विदेश'मैं भी चोकीदार' संदर्भात ५०० देशाशी जोडले जाणार पंतप्रधान मोदी

‘मैं भी चोकीदार’ संदर्भात ५०० देशाशी जोडले जाणार पंतप्रधान मोदी

Subscribe

आज दि. ३१ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या टीमसोबत दिल्लीमधील तालकाटोर स्टेडियम मध्ये एक मोठा मैं भी चोकीदार अभियान पुढे वाढवण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात खुद पंतप्रधान ५०० हून अधिक देशांसोबत जोडले जाणार आहेत.

काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेलच्या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चोकीदार चोर है’ अशी घोषणा केली होती. त्यानंतर काँग्रेसला प्रतिउत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: आपल्या ट्विटर अकाउंटचे नाव बदलून ‘मैं भी चोकीदार‘ असे ठेवण्यात आले. आता संपूर्ण मोदी टीमकडून ‘मैं भी चोकीदार’ हे अभियान सुरू करण्यात आले आहे. पंतप्रधान यांनी या मोहीमला प्रथम सुरूवात केली आणि त्यानंतर सगळ्यानीच आपल्या नावाच्या पुढे ‘मैं भी चोकीदार’ असे लिहीले. यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, सर्व केंद्रीय मंत्री, सर्व नेत्यांनी ‘मैं भी चोकीदार’ नावाला आपलेसे केले. तर आता चोकीदीर या घोषणेला भाजप वेगवेगळ्या देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठीच आज दि. ३१ रोजी पंतप्रधान मोदी आपल्या टीमसोबत दिल्लीमधील तालकाटोर स्टेडियममध्ये एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात खुद पंतप्रधान मोदी ५०० हून अधिक देशांसोबत जोडले जाणार आहेत.

व्हिडिओ कॉन्फरनद्वरे संवाद

‘मैं भी चोकीदार’ या अभिनयाला देशभर पसरवण्यासाठी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरनद्वरे पंतप्रधान नरेंद्र मोदी चोकीदार अभियान पुढे नेण्यात येणार आहेत. तर देशभरातील भाजप मंत्री, संसद, विधानपरिषद आणि अनेक नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऐकण्यासाठी उपस्थित असणार आहेत. यावेळी भाजपचे अध्यक्ष अमित शहा चांदणी चौकमध्ये तर गृहमंत्री राजनाथ सिंह पूर्व दिल्लीमध्ये असणार आहेत. तर सुषमा स्वराज आणि सांसद परवेश वर्मा दिल्ली, उत्तमनगरमध्ये असणार युपीचे मुख्यमंत्री आगरामधून तर सुलत्नापुरमध्ये मेनका गांधी, पीलीभीतमध्ये वरूण गांधी आणि भोपाळचे केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर येथून तर जया प्रदा रामपुरमधुन पंतप्रधान यांना ऐकणार आहेत.

- Advertisement -

२०१४ मधेही चोकीदाराचा उल्लेख

काँग्रेसने राफेल प्रकरणावरून मोदी सरकारला घेरले होते. त्यावेळी त्यांना उद्देशून ‘चोकीदार चोर है’ अशी घोषणा केली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकीच्या काळात ‘चोकीदार’ या शब्दाचा उल्लेख केला होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:ला चोकीदार बोलून काँग्रेसला भ्रष्टाचारामध्ये घेरले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -