शताब्दीमध्ये ‘मैं भी चौकीदार’ कपावरून वाद

काठगोदाम शताब्दी एक्सप्रेसमध्ये प्रवासांना 'मैं भी चोकीदार' ही घोषणा लिहीलेल्या कपामध्ये चहा दिली असता. एका इसमाने त्याबाबत तक्रार केल्यामुळे ठेकेदारांवर रेल्वेकढून कारवाई करण्यात आली आहे.

Main bhi chowkidar slogan become controvercial in shatabdi express
शताब्दीमध्ये 'मैं भी चौकीदार' कपावरून वाद

लोकसभा निवडनुकीच्या तारखांची अलिकडेच घोषणा झाली आहे. राज्य आणि स्थानिक स्थरावर प्रचारास सुरूवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘चौकीदार चोर है’ अशी पंतप्रधानांच्या विषयी घोषणा केली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिउत्तरामध्ये आपल्या ट्विटर अकाउंटचे नाव बदलून ‘मैं भी चोकीदार’ अशी घोषणा केले होती. नुकताच आता ‘मैं भी चोकीदार’ यावरून वाद उठला आहे. २०१९ ची निवडणुकीचा प्रचार आता चहाच्या पेल्यावर होताना दिसत आहे. ही घोषणा आता चहाच्या कपावर सुद्धा दिसू लागली आहे. रेल्वेमध्ये चहा देताना ‘मैं भी चोकादार’ ही घोषणा लिहीलेल्या कपचा वापर केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

रेल्वेने तात्काळ केली कारवाई

काठगोदाम शताब्दी या एक्सप्रेसमध्ये प्रवासांना ‘मैं भी चोकीदार’ ही घोषणा लिहीलेल्या कपामध्ये चहा दिली होती. त्यावेळी एका इसमाने या घटनेची तक्रार केली. त्यानंतर त्या चहावाल्याकडून रेल्वेने कप जामा करून घेतले. निवडणूक आयोग या घटनेसंबंधी गप्प आहे. मात्र, निवडणूक आयोगाने सांगितले की, ‘मैं भी चोकीदार’ अशी घोषणा असलेले कप छापण्यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा संबंध नाही आहे. तर हा कप संकल्प फाउंडेशनशी संबंधीत आहे, असे म्हटले आहे. दरम्यान, रेल्वेने या संबंधीत तात्काळ कारवाई केली आहे. ही घटना आज दि. २९ रोजी घडली आणि संबंधीत तक्रारीची दखल घेत ते कप ताब्यात सुद्धा घेण्यात आले आहेत. संबंधीत कंपनीवर आणि ठेकेदारावर रेल्वेकडून कारवाई करण्यात आली आहे.

विमान आणि रेल्वे मंत्रालयाला नोटीस

यापूर्वी निवडणूक आयोगाने विमान आणि रेल्वे टिकीटांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोचा वापर केला जात असल्यामुळे रेल्वे आणि विमानचालन मंत्रालयाला नोटीस पाठवली आली होती. निवडणूक आयोगाने दि. २७ रोजी पाठवलेल्या नोटीसमध्ये लिहीले आहे की, आचार संहिता लागू झाली तरी रेल्वे टिकीटांवर आणि एअर इंडियाच्या बोर्डिंग पासवरचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढला गेला नाही आहे. यासंबंधीत दोन्ही मंत्रालयाकडून निवडणूक आयोगाने तीन दिवसांमध्ये उत्तर देण्यास सांगितले आहे.