घरदेश-विदेशLPG Price: सिलिंडर 450 रुपयांत देण्याच्या घोषणेवरून सरकारचा U Turn; म्हणाले-'तो मी...

LPG Price: सिलिंडर 450 रुपयांत देण्याच्या घोषणेवरून सरकारचा U Turn; म्हणाले-‘तो मी नव्हेच’

Subscribe

देशातील पाच राज्यातील निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान सगळ्याच्या पक्षानी मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध घोषणा केल्या होत्या. त्यात भाजपला यश आले. मात्र, 450 रुपयाना सिलिंडर देऊ अशी घोषणा आम्ही केलीच नसल्याचे आता बोलले जात आहे.

नवी दिल्ली : राजस्थान निवडणुकीत घवघवीत यश मिळवून सत्ता स्थापन करणाऱ्या भाजप पक्षाने याच राजस्थान निवडणुकीत 450 रुपयांत LPG सिलिंडर देण्याची घोषणा केली होती. त्यांनतर त्यांना यशही मिळाले. परंतू राजस्थानात केलेल्या घोषणेला आज दिल्लीत अशी कुठलीच घोषणा आम्ही केली नसल्याचे पेट्रोलिअम मंत्री यांनी आज हिवाळी अधिवेशनादरम्यान म्हटले आहे. (LPG Price Governments U Turn on the announcement of giving a cylinder at Rs 450 Said – Its not me)

देशातील पाच राज्यातील निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान सगळ्याच्या पक्षानी मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध घोषणा केल्या होत्या. त्यात भाजपला यश आले. मात्र, 450 रुपयाना सिलिंडर देऊ अशी घोषणा आम्ही केलीच नसल्याचे आता बोलले जात आहे.

- Advertisement -

नेमका खुलासा कसा झाला?

संसदेची हिवाळी अधिवेशन सुरू असून, आज मंगळवारी (19 डिसेंबर ) राज्यसभा खासदार जावेद अली खान यांनी सरकारला विचारले की, सरकारने अलीकडेच राजस्थानमध्ये 450 रुपयांना एलपीजी सिलिंडर देण्याची घोषणा केली आहे का? केंद्र सरकार उत्तर प्रदेशसह संपूर्ण देशात 450 रुपयांना एलपीजी सिलिंडर देण्याचा विचार करत आहे का, असा सवालही त्यांनी सरकारला केला. त्याला उत्तर म्हणून दोन्ही प्रश्नांची लेखी उत्तरे देताना, पेट्रोलियम राज्यमंत्र्यांनी सांगितले की, अशी कोणतीही घोषणा केली नाही. भारत सरकारकडून राजस्थानमध्ये 450 रुपयांना एलपीजी सिलिंडर देण्याची कोणतीही घोषणा केली नसल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. तेव्हा आता निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान करण्यात येत असलेल्या घोषणा निवडणुकीनंतर प्रत्यक्षा कितपत उतरतात हा एक संशोधनाचा विषय आहे.

हेही वाचा : Winter Session : “Do or Die… नाना भाऊ धाडस करावं लागतं”, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

- Advertisement -

या राज्याच्या निवडणुकांमध्येही केली होती घोषणा

नुकत्याच राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि माजोरम या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. राजस्थानमधील केंद्रातील सत्ताधारी पक्ष भारतीय जनता पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात पीएम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 450 रुपयांमध्ये सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -