घरमहाराष्ट्रWinter Session : "Do or Die... नाना भाऊ धाडस करावं लागतं", मुख्यमंत्र्यांचा...

Winter Session : “Do or Die… नाना भाऊ धाडस करावं लागतं”, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

Subscribe

राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन बोलवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली. तसेच, यावेळी त्यांनी नेहमीप्रमाणे विरोधकांवरही त्यांच्या मिश्किल शैलीत टोले लगावले.

नागपूर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आज (ता. 19 डिसेंबर) मंगळवारी नवव्या दिवशी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे निवेदन दिले. यावेळी त्यांनी राज्य सरकारची बाजू मांडत सरकार मराठा आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याची माहिती सभागृहात दिली. तसेच, त्यांनी राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन बोलवणार असल्याची घोषणा विधानसभेत केली. तसेच, यावेळी त्यांनी नेहमीप्रमाणे विरोधकांवरही त्यांच्या मिश्किल शैलीत टोले लगावले. सरकार पूर्ण सकारात्मक आहे. नानाभाऊ सगळं करायला धाडस लागतं. घाबरुन घाबरुन मी काम करत नाही, अशी टीकाही त्यांच्याकडून करण्यात आली आहे. (Winter Session: CM Eknath Shinde taunts his opponents over the issue of Maratha reservation)

हेही वाचा – Winter Session : मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत बोलवणार विशेष अधिवेशन, मुख्यमंत्र्यांची घोषणा

- Advertisement -

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांना टोले लगावत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “सरकार पूर्ण सकारात्मक आहे. नानाभाऊ सगळं करायला धाडस लागते. घाबरुन घाबरुन मी काम करत नाही. अरे डू ऑर डाय… जे लोकांच्या मनात होते, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होते, बाळासाहेबांना जे अभिप्रेत होते ते एकनाथ शिंदेने केले. दीड वर्षात या सरकारने केलेली कामगिरी तुमच्यासमोर आहे. नानाभाऊ अजित दादांनी काय सांगितले? पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशाचे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे अजित दादा विकासाबरोबर आलेले आहेत, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

तसेच, कोणाच्याही मनात संभ्रम निर्माण होता नये. नोंदी 1967 पूर्वीच्या आहेत. ज्या नोंदी जुन्या सापडल्या आहेत, त्यांच्या रक्ताच्या नातेवाईकांना ओबीसी प्रमाणपत्रे मिळतील. कोणाला न्याय देताना कुणावरही अन्याय होणार नाही, असे स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ओबीसी समाजाला धक्का न लावता, मराठा समाजाला टिकणारे आरक्षण आम्ही देणार आहोत. आम्ही अनेकदा बोललो, तरी संभ्रम, शंका काही लोकांच्या निर्माण होते. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमच्याकडून जे जे होईल ते करु. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आहे. ही शपथ कोणत्याही समाजावर प्रसंग आला असता तरी मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली असती. जो समाज अडचणीत आहे त्याच्यापाठीमागे आपण आहोत. मी जो संकल्प करतो, तो संकल्प पूर्ण करतो हे महाराष्ट्राने एक-दीड वर्षापूर्वी पाहिलेले आहे, असेही त्यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -