घरताज्या घडामोडी'माझं कुणीच ऐकत नाही' अल्पवयीन मुलीने केला आई-भावाचा खून

‘माझं कुणीच ऐकत नाही’ अल्पवयीन मुलीने केला आई-भावाचा खून

Subscribe

शनिवारी सायंकाळी उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ दुहेरी हत्याकांडानं हादरलं. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या शासकीय निवासस्थानाजवळील रेल्वे कॉलनीत ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. रेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नीसह मुलाची हत्या करण्यात आली होती. पण या प्रकरणाचा रेल्वे पोलिसांनी काही तासातच तपास लावला. रेल्वे अधिकाऱ्याच्या मुलीनेच आई आणि भावाची हत्या केल्याचं धक्कादायक सत्य तपासात समोर आलं आहे.

लखनौतील गौतम पल्ली येथील रेल्वे कॉलनीत दोघांची हत्या करण्यात आली होती. रेल्वेमध्ये उच्च पदावर अधिकारी असलेल्या आर.डी. वाजपेयी यांची पत्नी आणि मुलांची घरातच गोळ्या घालून हत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्तांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मायलेकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचं प्रथमदर्शन दिसून आल्यानंतर पोलीस महासंचालक एच.सी.अवस्थी यांनीही घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली.

- Advertisement -

या तपासात एक धक्कादायक गोष्ट समोर आली म्हणजे या मायलेकांची हत्या त्यांच्या मुलीनेच केली. रेल्वेत वरिष्ठ अधिकारी असलेल्या वाजपेयी यांच्या पत्नी व मुलाची हत्या त्यांच्या मुलीनेच केल्याचं पोलीस तपासात समोर आलं. ही मुलगी राष्ट्रीय स्तरावरील नेमबाज असून, अल्पवयीन असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

नैराश्यातून आत्महत्या

आरोपी मुलगी नैराश्यात आहे. घटनेनंतर ती ट्रामा सेंटरमध्ये दाखल झाली होती. पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केल्यानंतर तिने स्वतः हत्या केल्याचं कबूल केलं. तिच्या हातावर ब्लेडच्या खुणा आढळून आल्या. ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्या मुलीला हाताच्या खूणाबघून पोलिसांनी विचारले असता, ती म्हणाली दरोरोज हजारो लोक मरतात यात काय वेगळं आहे. नैराश्यात असलेल्या आरोपींवर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

- Advertisement -

हे ही वाचा – तंबाखू पासून कोरोनाची लस? माकडांवर यशस्वी चाचणी झाल्याचा दावा


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -