घरदेश-विदेशआपल्या वक्तव्यावर कमलनाथ ठाम

आपल्या वक्तव्यावर कमलनाथ ठाम

Subscribe

उत्तर प्रदेश, बिहारमधील लोकांमुळे स्थानिकांना नोकरी मिळत नाही असं वक्तव्य कमलनाथ यांनी केलं होतं. त्यावर कमलनाथ अद्याप देखील ठाम आहेत.

उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकांमुळे मध्य प्रदेशात बेरोजगारी असल्याचं वक्तव्य मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केलं होतं. शिवाय, स्थानिकांना नोकरीमध्ये ७० टक्के प्राधान्य द्यावे अशी अट देखील उद्योगांसमोर ठेवली होती. या अध्यादेशावर सही देखील केली होती. आपल्या या वक्तव्यावर आणि निर्णयावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ ठाम आहेत. यावेळी त्यांनी ही योजना सर्वत्र लागून असल्याचं म्हटलं आहे. त्यामध्ये नवीन काय? असा सवाल देखील केला आहे. बुधवारी पोलीस मुख्यालयात आयपीएस अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर कमलनाथ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी गुजरातचं उदाहरण देखील दिलं. दरम्यान, माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी ट्विटद्वारे आपले मत व्यक्त केलं आहे. प्रदेशात ना कोणी इकडचा ना तिकडचा. मध्य प्रदेशात जो कोणी येतो तो इकडचाच होऊन जातो. मध्य प्रदेश हे देशाचं ह्रदय असं चौहान यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 वाचा – मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी ओढली राज ठाकरेंची ‘री’!!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -